weather forecat : भारत हा शेतीप्रधान देश आहे. मात्र आता शेतकऱ्यांवर मोठे संकट येत असल्याचे समजत आहे. कारण वातावरणातील बदलांमुळे शेतकर्यांमध्ये चिंतेची बाब आहे.
ग्रामिण कृषि मौसम सेवा केंद्राने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील काही काळ सरासरी ढगाळ वातावरण असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे संबंधित भागातील शेतकऱ्यांनी कोणत्या पिकाची कशा प्रकारे काळजी घ्यावी याबाबत सविस्तर सल्ला दिला आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/03/ahmednagarlive24-Crisis-on-farmers-again-due-to-cloudy-weather-after-heavy-rains.jpg)
हवामान कसे असेल?
सांगली,कोल्हापूर आणि सातारा तीन मुद्दे या केंद्रात विभागीय कृषी संशोधन ही माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. या केंद्राचे प्रादेशिक पर्यावरण केंद्र, स्थानिक सार्वजनिक मंडळा मुंबईकडून सात मार्च या सांगली आणि तीन अंकात 6 मार्च ते 77 तारीख या आकाश अंशी ढगाळ राहण्याची शक्यता सांगितली जात आहे.
कमाल तापमान हे 33 ते 35 सेल्सिअस, सांगली कमाल तापमान 36 ते 37 से सिल्सअस त्याचप्रमाणे तापमान हे 335 सेल्सिअस अनुक्रमे तापमान हे 335 सेल्सिअस असेल तर तापमान हे 33 ते 35 सेल्सिअस, 17 ते 19 आणि 17 ते 18 सेल्सिअस च्या आसपास राहण्याची आहे.
कोल्हापुरमधील सकाळ सत्रातील सापेक्ष आद्रता 52ते 79% तर दुपारची सापेक्ष आद्रता 31 ते 43% असेल. सापेक्ष आद्रता 52 ते 66% काळातील सापेक्ष आद्रता 28 ते 30% सापेक्ष आद्रता 6 ते 68% या दरम्यान तर सापेक्ष आद्रता 33 ते 40% दरम्यान असू शकते.
कोल्हापूर, सांगली, सातारा या तिन्ही पक्षासाठी अनुक्रमे वाऱ्यांचा वेग ताशी 9 ते 12 वर्ग, 12 ते 16 वर्ग आणि 10 ते 15 कि.मी. दरम्यान राहण्याची सत्यता वर्तविली आहे.
पिकांची घ्या अशी काळजी
रब्बी ज्वारी
पक्व होत असणाऱ्या ज्वारी पिकाचे पक्षांपासून शक्य तेवढे संरक्षण करावे. त्याचबरोबर ज्वारीच्या दाण्याच्या टोकावर काळ्या रंगाचे ठिपके दिसताच दिसताच आपल्या ज्वारीची काढणी करावी. काढणी केलेली ज्वारी 8 ते 10 दिवस उन्हात वाळवावी.
गहू
गहू पिकाची कापणी ही पिक पक्व होण्याच्या अगोदर 2-3 दिवस करावी. असे केल्याने गव्हाचे दाणे शेतात गळून पडणार नाही. गव्हाच्या कापणीच्या वेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण 15 % पर्यंत असावे.
हरभरा
शेतामध्ये लवकर लागवड केलेल्या आणि पूर्णपणे पक्व झालेल्या हरभरा या पिकाची काढणी, मळणी करावी. आपण मळणी केलेले हरभरा / धान्य उन्हामध्ये 6 ते 7 दिवस वळण्यासाठी ठेवावे. तसेच पीक सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावे. हरभरा पिकाची साठवणूक करताना त्यामध्ये 5 % कडुनिंबाचा पाला घालावा त्यामुळे कीड कमी प्रमाणात लागते.
भुईमूग
आपण उन्हाळी भुईमुग पिकास जमिनीच्या मगदुरानुसार 8 ते 10 दिवसाच्या अंतराने पिकाला पाणी द्यावे. भुईमुग या पिकामधील सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी या पिकावर 0.5 % लोह आणि 0.2 % झिंक सल्फेट या मिश्रणाची पेरणीनंतर 30 दिवसांनी फवारणी पिकावर करावी.
मिरची
गेल्या आठवड्यात हवामान कोरडे असल्यामुळे मिरची वर किडीचा प्रादुर्भाव झाला. यावर नियंत्रण आणण्यासाठी फेनप्रोपॅथ्रीन 30% इ सी 5 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
आद्रक
पक्व झालेल्या आल्याची बाजारातील मागणी नुसार काढणी करावी. आल्याची काढणी केल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यावेत. आणि ते बाजारात विक्रीसाठी पाठवावेत.
हळद
हळदीची काढणी ही पिकाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर करावी. काढणी करण्याच्या अगोदर सुमारे एक महिना पाणी देणे बंद करावे.
स्ट्रॉबेरी
या पिकाच्या लागवडीनंतर 80 ते 90 दिवसांनी पक्व झालेल्या फळाची काढणी करावी. ही काढणी एक दिवसाचा अवधी सोडून करावी. या फळाच्या साठवणी साठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. स्ट्रॉबेरी ची फळे 0 ते 4 सेल्सिअस मध्ये 4 तासात थंड केली जातात. यामुळे फळे चांगली राहतात.
पशुधन
लाळ खुरकत या रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी रोग प्रतिबंधक लस डॉक्टरांच्या सल्ल्याने द्यावी. तीन महिन्यांपेक्षा कमी वय असणाऱ्या आणि गाबन जनावरांना लस देऊ नये.