Best Investment Options for Women : सुरक्षित आणि ज्या योजनेत परताव्याची विना जोखिम हमी मिळते, अशा ठिकाणी महिला गुंतवणूक करत असतात. फक्त एक चांगला गुंतवणुकीचा निर्णय तुम्हाला काही वर्षांत लखपती होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करू शकतो.
तसेच जर तुम्ही चांगला परतावा देणाऱ्या योजनेत गुंतवणूक केली तर तुमचे भविष्य सुरक्षित राहते. तुम्ही आता चांगला आणि कोणत्याही जोखिमेशिवाय परतावा देणाऱ्या योजनेत गुंतवणूक करू शकता. या योजना कोणत्या आहेत? त्यात किती परतावा मिळत आहे? पाहुयात सविस्तर.

एसआईपी द्वारे गुंतवणूक
एखाद्या व्यक्तीला म्युच्युअल फंडामध्ये SIP किंवा सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे किंवा एकावेळी एकरकमी रक्कम देऊन गुंतवणूक करता येते.
जाणून घ्या फायदे:
- बाजारातील अस्थिरतेवर अवलंबून उच्च परतावा मिळतो.
- मासिक गुंतवणूक रक्कम ₹500 इतकी कमी असते.
- जोखीम कमी करण्यासाठी, गुंतवकणूकदारांना वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ तयार करता येतो.
- गुंतवणुकीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे म्युच्युअल फंड.
PPF
PPF ही महिला आणि पुरुष दोघांसाठीही गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित आणि सर्वात विश्वासार्ह बचत योजना असून ती सरकारद्वारे समर्थित आणि नियंत्रित आहे. ही योजना महिलांसाठी त्यांच्या कष्टाचे पैसे धोक्यात न घालता त्यांच्या मासिक पगाराचा काही भाग वाचवण्याचा चांगला मार्ग आहे.
काय आहेत फायदे?
- जर तुम्हाला पीपीएफ खाते चालू करायचे असेल तर तुम्ही ते कोणत्याही बँकेत किंवा वित्तीय संस्थेत उघडू शकता.
- या योजनेचे दुहेरी फायदे आहेत कारण ही केवळ गुंतवणूक योजना नसून ती बचत योजनाही आहे.
- या योजनेच्या सध्या वार्षिक गुंतवणुकीवर 7.1 टक्के व्याजदर मिळत आहे.
- त्याचा लॉक-इन कालावधी 15 वर्षांचा असून त्यापूर्वी गुंतवणूकदारांना ठेव काढता येत नाही, त्यावर शुल्क आकारले जाते.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुंतवणूकदारांना केवळ योगदानावरच नाही तर आयकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत मिळणाऱ्या व्याजावरही कर लाभ मिळतो.
- PPF खात्यासाठी किमान आणि कमाल गुंतवणूक रक्कम अनुक्रमे ₹500 आणि ₹1,50,000 इतकी आहे.
एफडी
एफडीमध्ये गुंतवणूक करणे हा एखाद्याच्या बचतीचे मूल्य वाढवण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे. कमीत कमी जोखमीसह उच्च व्याजदर प्रत्येक बँकेत बदलत असताना, भविष्यात चांगल्या हमी परताव्यासाठी मुदत ठेव हा चागंला गुंतवणूक पर्याय म्हणून गणला जातो. प्रमुख बँकांद्वारे ऑफर करण्यात येणाऱ्या एफडीवरील व्याजदर प्रत्येक वर्षी 1.85% ते 6.95% दरम्यान असतात. बँकांच्या वेगवेगळ्या श्रेणीनुसार कमाल ठेव मर्यादा बदलत असते. तथापि, गुंतवणूकदार जमा करू शकणारी किमान रक्कम ₹1,000 आहे.
सोन्यातील गुंतवणूक
प्राचीन काळातील राजे-राण्यांच्या काळापासून प्रसिद्ध असणारी आणि खात्रीशीर परतावा देणारी गुंतवणूक पद्धत म्हणजे सोन्याची गुंतवणूक होय. जर तुम्हाला यातील गुंतवणूक तुमच्यासाठी चांगली आहे की नाही याची खात्री करून घ्यायची असल्यास तुम्ही इंटरनेट सर्च करा आणि 1800 पासून 2023 पर्यंत प्रत्येक 50 वर्षांच्या अंतराने सोन्याच्या मूल्याचे संशोधन करा आणि तुम्हाला तुमचे उत्तर मिळून जाईल.
राष्ट्रीय पेन्शन योजना
भारत सरकारने सुरू केलेली आणि पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी प्रशासित, राष्ट्रीय पेन्शन योजना ही महिलांसाठी सरकार-समर्थित सर्वात चांगली बचत योजनांपैकी एक मानली जाते. सर्व महिला गुंतवणूकदार ज्यांना त्यांच्या निवृत्तीनंतर चांगला आर्थिक निधी उभारण्याची इच्छा आणि ज्यांना जीवनात मोठी आर्थिक जोखीम पत्करायची नाही त्यांनी या योजनेची निवड करावी.