रोहित पवार म्हणाले कर्जत-जामखेडला कोणत्याही वेगळ्या पॅटर्नची गरज नाही …कारण

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 :- आरोग्याच्या दृष्टीने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जामखेड शहरातील प्रत्येक कुटुंबीयांचा सर्वे करुन आरोग्य तपासणी करण्याचे काम सुरू आहे. नगर जिल्ह्यातील जामखेड शहरात सर्वात जास्त रुग्ण सापडले आहेत, त्यामुळे सर्वे होणार असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जामखेड शहरातील कोरोना बाधीतांची संख्या ही आता १७ वर जाऊन पोहचली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या नकाशावर जामखेड शहराचे नाव येत आहे. शहरातील परीस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आसल्याने प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

याच अनुषंगाने सोमवारी दुपारी कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी प्रदीप मुरंबीकर, पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील,

अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ पोखर्णा, आरोग्य अधिकारी डाॅ. युवराज खराडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डी सुनील बोराडे, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्या सह अनेक प्रशासनाचे कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार पवार म्हणाले की,प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे कोरोनाचा इतर भागात फैलाव झाला नाही. चाचण्या,शोधमोहीम,सुरक्षितता हे सर्व प्रभावीपणे राबवण्यात येत आहे.

रुग्णांची संख्या वाढली असली तरी जेवढे आपण मुळाशी जाऊ तेवढा इतरांना धोका होणार नाही.आपल्याला प्रत्येकाचा जीव महत्वाचा आहे. कर्जत-जामखेडला कोणत्याही वेगळ्या पॅटर्नची गरज नाही त्या ठिकाणी पहिल्यापासुनच योग्य नियोजन सुरू आहे.

जामखेड शहरात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची वाढती संख्या ही चिंताजनक बाब आहे. पंरतु राज्यात लोकसंख्येचा विचार करता सर्वात जास्त कोरोना तपासण्या जामखेड शहरातील लोकांच्या झालेल्या आहेत.

तसेच जामखेड शहरात पाॅझिटिव्ह सापडलेल्या भागात जास्त दाटीवाटीने राहणारे लोक आहेत यामुळे पाॅझिटिव्ह संख्या जास्त दिसत आहे.तरीही आता सर्व शहर एका कंन्ट्रोल अंतर्गत आणले असून कोणीही बाहेरचा व्यक्ती शहरात येणार नाही व शहरातील व्यक्ती बाहेर जाणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.

अत्यावश्यक सेवा घरपोच मिळतील तेव्हा नागरिकांनी काही दिवस हि आचारसंहिता पाळली तर आपण लवकरात लवकर या रोगावर मात करू तसेच आशा सेविका मार्फत सारीचाही सर्वे सुरू आहे. 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment