Maruti Alto EV : भारतात सध्या अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहने लॉन्च केली आहे. तसेच नवनवीन इलेक्ट्रिक वाहने देखील भारतीय ऑटो क्षेत्रात लॉन्च होत आहेत. आता मारुती सुझुकीची एकेकाळी सर्वाधिक लोकप्रिय असलेली अल्टो कार देखील इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये लॉन्च होणार आहे.
मारुती सुझुकी कंपनीच्या कारचा सध्या सर्वाधिक खप होत आहे. तसेच मारुती सुझुकी सर्वाधिक कार विकणारी कंपनी ठरली आहे. आता कंपनीकडून ऑटो क्षेत्रात पुन्हा एकदा धमाका केला जाणार आहे. कारण आता अल्टोचे इलेक्ट्रिक व्हर्जन भारतामध्ये लॉन्च केले जाणार आहे.
मारुती सुझुकी कंपनीकडून अल्टोचे इलेक्ट्रिक व्हर्जन लॉन्च करण्यासाठी तयारी देखील सुरु केल्याची माहिती मिळत आहे. आता पुन्हा एकदा मारुती सुझुकी अल्टोचे इलेक्ट्रिक व्हर्जन लॉन्च करून मार्केटमध्ये वर्चस्व कायम ठेवण्याच्या तयारीत आहे.
अल्टो कारमध्ये अनेक नवीन दमदार फीचर्स देण्यात येणार असल्याची शक्यता आहे. तसेच अल्टो इलेक्ट्रिक कार ही ५ सीटर असणार आहे. तसेच कारची किंमत देखील कमी असणार असल्याचे बोलले जात आहे.
इलेक्ट्रिक अल्टोची रेंज
अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार बाजारात लॉन्च झाल्या आहेत. मात्र या इलेक्ट्रिक कारची किंमत जास्त आहे आणि रेंज देखील कमी आहे. मात्र मारुती सुझुकीकडून अल्टो या इलेक्ट्रिक कारमध्ये जबरदस्त बॅटरीपॅक देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
इलेक्ट्रिक अल्टो कारमध्ये सिंगल चार्जमध्ये ३०० किमी धावण्यापर्यंतची क्षमता देण्यात येणार आहे. तसेच या कारची किंमत देखील इतर इलेक्ट्रिक कारपेक्षा कमी असणार आहे. त्यामुळे आता कमी बजेट असणारे ग्राहक देखील इलेक्ट्रिक कार खरेदी करू शकतात.
हे फीचर्स आणि सेफ्टी फीचर्स इलेक्ट्रिक अल्टोमध्ये उपलब्ध असतील
सुरक्षेसाठी, त्यात किमान 4 एअर बॅग देण्यात येणार आहेत, ज्यामध्ये प्रवासी तसेच ड्रायव्हरच्या वरच्या बॅगचा समावेश असेल! यासोबतच अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम, पॉवर स्टीयरिंग, पॉवर विंडोज रीअर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, एअर कंडिशनर, पार्किंग सेन्सर, डिजिटल डिस्प्ले ही फिचर्स उत्तम शैलीत उपलब्ध होणार आहेत.
इलेक्ट्रिक अल्टोची किंमत
मारुती सुझुकी कार पहिल्यापासूनच कमी किमतीमध्ये उपलब्ध आहेत. तसेच इतर कारच्या तुलनेत मारुती सुझकी कंपनीच्या कार मायलेजच्या बाबतीत देखील दमदार आहेत. तसेच आता इलेक्ट्रिक अल्टो कारची किंमत अंदाजे 10 ते 12 लाख रुपये असू शकते.