Birth and Death Registration : जन्म किंवा मृत्यूची नोंद करणे तसे अवघड काम नाही किंवा खर्चिकही नाही. मात्र त्याला विलंब झाला तर वेळ, पैसा आणि श्रमही वाया जातात. आधी जन्म किंवा मृत्यूची नोंद उशिरा करावयाची असल्यास ते अधिकारी तहसीलदार किंवा तालुका दंडाधिकारी यांना होते.
यासाठी १०० रुपयांच्या स्टॅपपेपरवर सेतूकडून जाहीरनामा काढावा लागत होता. आता मान्त्र, जन्म किंवा मृत्यूचा दाखला हवा असेल तर थेट न्यायालयातच जावे लागते.
अनेकदा दुर्लक्षामुळे एखाद्या व्यक्तीची जन्माची किंवा मृत्यूची नोंदणी वर्षभराच्या आत ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका आदी ठिकाणी केली गेली नसेल तर त्यांना आता जन्म किंवा मृत्यूदाखल्यासाठी न्यायालयात दादा मागावी लागणार आहे. हे टाळण्यासाठी नागरिकांनी घरातील व्यक्तींची २१ दिवसांच्या आतच जन्म किंवा मृत्यूची नोंद करणे गरजेचे आहे.
नोंदणीची प्रक्रिया
जन्म-मृत्यूची नोंद उशिरा करणाऱ्यांना थेट न्यायालयातूनच हा दाखल घ्यावा लागतो. या न्यायालयीन प्रक्रियेत खूप वेळ जातो. अनेकवेळा चकरा माराव्या लागतात, याचा सर्वसामान्यांना मोठा मानिसक, आर्थिक त्रास सहन करावा लागतो. तसेच वृत्तपत्रांमधून जाहीर नोटीसही प्रसिद्ध करावी लागते. बहुतांशी जणांना ही प्रक्रिया माहीत नसल्यामुळे ते प्रथम तहसील कार्यालयातच हेलपाटे मारतात.
जन्म-मृत्यूची नोंद कोठे करता येते
■ ग्रामीण, शहरी भागातील नागरिकांनी जन्म-मृत्यूची घटना घडल्यानंतर संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड, महापालिका आदी ठिकाणी २१ दिवसांच्या आत महिती देणे गरजेचे आहे.
■ मुदतीच्या आत जन्म- मृत्यूची नोंद व माहिती वेळेवर देणे कायद्याने सक्तीचे आहे.