Health Tips : जमिनीवर बसून जेवल्याने काय होते ? जाणून घ्या महत्वाची माहिती

Ahmednagarlive24 office
Published:
Health Tips

पचनक्रिया सुधारते : ज्यावेळी आपण जमिनीवर जेवायला बसतो त्यावेळी साहजिकच मांडी घालून बसतो. ही स्थिती अर्धपद्मासनाची असते. या स्थितीमध्ये बसल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

जेवणाचं ताट जमिनीवर असल्यामुळे जेवणाचा घास घेण्यासाठी वाकावं लागतं. त्यामुळे शारीरिक हालचाल होते. परिणामी, पोटाजवळील स्नायूंना चालना मिळते व पचनाची क्रियादेखील सुधारते.

वजन घटवण्यास मदत होते : जमिनीवर बसून जेवल्यामुळे मेंदू शांत होतो आणि आपलं संपूर्ण लक्ष जेवणावर केंद्रित होतं. त्यामुळे शरीराला आवश्यक तेवढं जेवण आपण जेवतो. टेबलापेक्षा जमिनीवर बसून जेवल्याने, जेवणाचा वेग मंदावतो व पोट आणि मेंदूतील समन्वयता सुधारते. परिणामी अतिप्रमाणात खाण्याची वृत्ती कमी होते व वजनही नियंत्रणात राहते.

लवचिकता वाढवते: पद्मासनात बसल्याने, पाठीचे, कमरेतील तसेच पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने पचनसंस्थेचा मार्ग सुधारतो. पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने शरीर लवचिक व आरोग्यदायी बनण्यास मदत होते.

शरीराची स्थिती सुधारते : शरीराची स्थिती उत्तम राखणे हे निरोगी आरोग्याचे गमक आहे. उत्तम शारीरिक स्थितीमुळे काही अपघात टळू शकतात तर शरीरातील काही स्नायू व सांध्यांवरील अतिरिक्त ताण कमी करून थकवा कमी होण्यासदेखील मदत होते.. जमिनीवर बसून जेवताना पाठीचा कणा ताठ राहतो व पोट, खांदा व पाठीच्या स्नायूंची योग्य प्रमाणात हालचाल होते.

गुडघे व कमरेतील सांधे मजबूत होतात : जमिनीवर पद्मासनात बसल्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. पचन संस्थेसोबतच सांधेदुखीचा त्रास होत नाही. गुडघा, घोटा व कंबरेतील सांधे लवचिक राहिल्याने अनेक विकार दूर होण्यास मदत होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe