Solar Panel : आता तुम्ही सौर पॅनेल बसवून प्रत्येक लाखो रुपयांची कमाई करू शकता. यातील चांगली गोष्ट म्हणजे या योजनेंतर्गत सरकार तुम्हाला सौर पॅनेल्स बसविण्यास मदत करेल. आर्थिक दुर्बल घटकांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवून ही योजना सुरु केली आहे.
अगोदर या योजनेंतर्गत 25 kW पर्यंतचे प्रकल्प उभारता येत होते, परंतु आता याची मर्यादा 200 kW पर्यंत वाढवली आहे. एमएसएमई योजनेंतर्गत 30 टक्के सबसिडी मिळत आहे. तुम्हाला जिल्हा सहकारी बँकांकडून उद्योग विभागामार्फत कर्ज उपलब्ध होईल.

लक्षात ठेवा ही गोष्ट
- या योजनेंतर्गत 20, 25, 50, 100, 200 किलोवॅटचे सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यात येणार आहेत.
- एमएसएमई धोरणांतर्गत लाभार्थ्यांना सर्व फायदे मिळतील.
- पात्र व्यक्तीला त्यांच्या खाजगी जमिनीवर किंवा भाडेतत्त्वावर जमीन घेऊन या प्रकल्प चालू करता येईल.
- तसेच या शानदार योजनेअंतर्गत, इन्व्हेस्ट उत्तराखंड पोर्टलवर सिंगल विंडोद्वारे अर्ज केले जातील.
- हे लक्षात घ्या की UREDA द्वारे ही योजना राबवली जाणार आहे. UPCL, उद्योग आणि सहकारी बँका सहयोगी संस्था म्हणून काम करेल.
पात्रता
या योजनेअंतर्गत फक्त राज्यातील कायमस्वरूपी रहिवाशांना अर्ज करता येईल. परंतु त्यांचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असणे गरजेचे आहे. इतकेच नाही तर त्यांना शैक्षणिक पात्रतेची कोणतीही अट नाही. परंतु हे लक्षात ठेवा की एका कुटुंबातील फक्त एका अर्जदाराला सौरऊर्जा प्रकल्पाचे वाटप केले जाईल. त्यासाठी अर्जदाराला प्रतिज्ञापत्रही द्यावे लागेल.
खर्च
या योजनेंतर्गत, 50 किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्पासाठी 750-1000 चौरस मीटर जमीन, 100 किलोवॅटसाठी 1500-2000 तसेच 200 किलोवॅटसाठी 3000-4000 चौरस मीटर जमिनीची गरज असेल. या योजनेवर प्रति किलोवॅट 50 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. 50 KW मधून 76000 युनिट्स, 100 KW मधून 152000 आणि 200 KW मधून 304000 युनिट्स प्रत्येक वर्षी निर्माण होतील. तसेच योजनेअंतर्गत, UPCL 25 वर्षांसाठी वीज खरेदी करेल, UPCL कडे जी काही वीज येईल, त्याचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात.
मिळेल कर्ज-
या योजनेंतर्गत सहकारी बँकांकडून 15 वर्षांच्या कालावधीसाठी आठ टक्के व्याजदराने कर्ज मिळते. या योजनेंतर्गत, जमीन विक्री करार, भाडेपट्टा करार आणि जमीन वापरावरील मुद्रांक शुल्कात सवलत असेल.
जाणून घ्या प्रक्रिया
या योजनेत तुम्ही अर्ज केल्यानंतर, UREDA त्याची तपासणी करून सात दिवसांच्या आत UPCL कडे पाठवला जाईल. UPCL 15 दिवसांच्या आत प्राथमिक तपासणीनंतर UREDA ला तांत्रिक व्यवहार्यता अहवाल (TFR) परत पाठवू शकेल. जर ते बरोबर असल्यास तर समितीला १५ दिवसांच्या आत वाटप पत्र (LOA) जारी करावे लागणार आहे. यानंतर, UPCL आणि अर्जदार यांच्यात 10 दिवसांच्या आत वीज खरेदी करार (PPA) केला जाईल.
तसेच 10 दिवसांच्या आत, अर्जदाराला पीपीएच्या प्रतीसह जिल्हा उद्योग केंद्राकडे अर्ज करावा लागणार आहे. १५ दिवसांच्या आतमध्ये उद्योग विभागाला एमएसएमई अनुदान आणि कर्जासाठी प्रक्रिया करावी लागणार आहे. कर्ज अर्ज 10 दिवसांच्या आत जिल्हा सहकारी बँकेकडे पाठवावा लागेल. LOA च्या 12 महिन्यांच्या आत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येईल. त्यानंतर दोन महिन्यांत कर्जावर अनुदान मिळेल.
अशी होईल कमाई
50 किलोवॅटचा प्रकल्प उभारले तर त्यावर एकूण 25 लाखांचा खर्च होईल. परंतु यातून वर्षाला ७६ हजार युनिट विजेची निर्मिती होईल. त्यासाठी तुम्हाला एकूण 17 लाख 50 हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध होईल. त्याशिवाय एमएसएमई योजनेंतर्गत 7 लाख 50 हजारांचे अनुदान मिळेल.
सध्याच्या 4.49 रुपये प्रति युनिट दराने वीज विकली तर तुम्हाला वार्षिक 3 लाख 41 हजार 240 रुपये कमावता येतात. त्याच्या देखभालीसाठी वार्षिक 35 हजार रुपये खर्चावे लागतील. मासिक हप्ता 9,557 रुपये आणि कमाई 15,963 रुपये असणार आहे. तुमचे कर्ज संपल्यानंतर, मासिक कमाई 25,520 रुपयांची होईल.