Post Office : देशातील प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी पोस्ट ऑफिसमार्फत अनेक बचत योजना राबवण्यात येतात. यात अनेक योजनांचा समावेश असून पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ही तुमच्यासाठी एक उत्तम बचत आणि सुरक्षित योजना आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेत महिन्यातून फक्त एकदाच पैसे जमा करून भरघोस उत्पन्न मिळवता येते. त्यामुळे देशभरात नागरिक पोस्टामध्ये गुंतवणूक करतात. तुम्हीही या योजनेत गुंतवणूक करून शानदार परतावा मिळवू शकता. जाणून घ्या सविस्तर माहिती.
3 लाख रुपये जमा करून मिळवा पेन्शन
एमआयएस कॅल्क्युलेटरनुसार, आता कोणतीही व्यक्ती 3 लाख रुपये जमा करून एकच खाते चालू करू शकते आणि मॅच्युरिटीनंतर, पुढील 5 वर्षांसाठी एकूण 20 हजार रुपये खर्च येतो. अशा प्रकारे तुम्हाला ५ वर्षात एकूण ९९ हजार रुपयांचे शानदार व्याज मिळेल. हे लक्षात घ्या की पोस्ट ऑफिस MIS अजूनही 6.6 टक्के दराने गुंतवणूकदारांना वार्षिक व्याज मिळते.
तुम्हाला पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेमध्ये किमान 1,000 रुपये गुंतवून खाते चालू करता येते. यात एकल आणि संयुक्त दोन्ही खाती चालू करता येतात. तुम्हाला एका खात्यात किमान 4.5 लाख रुपये तर संयुक्त खात्यात 9 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येतात. महत्त्वाचे म्हणजे या योजनेत तुम्हाला प्रत्येक महिन्याला व्याज मिळते. देशातील कोणत्याही नागरिकाला या योजनेत गुंतवणूक करता येते.
मुदतपूर्व खात्यातील शुल्क
तुम्हाला मासिक उत्पन्न बचत योजनेत 5 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. या योजनेमध्ये मुदतपूर्व सुविधा उपलब्ध असून एकंदरीत जमा केल्याच्या तारखेपासून 1 वर्षानंतर तुम्हाला पैसे काढता येतात. समजा नियमांनुसार 1 ते 3 वर्षात पैसे काढल्यास जमा केलेल्या रकमेतील 2 टक्के रक्कम कापून परत केले जातात. तुम्ही खाते चालू केल्यांनतर ३ वर्षांच्या मुदतीपूर्वी पैसे काढले तर, जमा केलेल्या रकमेपैकी १% वजा केल्यावर तुम्हाला परत केले जाते.
असे चालू करा खाते
POMIS खाते चालू करण्यासाठी, तुमच्याकडे आधार कार्ड किंवा पासपोर्ट किंवा मतदार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स असावे. तसेच तुम्हाला 1 पासपोर्ट आकाराचा फोटो द्यावा लागणार आहे. पत्त्याच्या पुराव्यासाठी, ओळखपत्र किंवा युटिलिटी बिल सरकारकडून स्वीकारले जाते.
पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला ही सर्व कागदपत्रे फॉर्मसह जमा करावी लागतात. या फॉर्ममध्ये नामनिर्देशित व्यक्तीचे नाव देऊन खाते चालू करण्यासाठी, केवळ 1,000 रुपये आवश्यक आहेत जे तुम्हाला रोख किंवा चेकद्वारे अदा करता येतात.