आजच्या काळात बँक खाते नसलेले व्यक्ती सापडणे मुश्कीलच. काही लोक एकापेक्षा जास्त बँकांमध्ये खाती उघडतात. परंतु आता सर्व खातेदारांची महत्वाची बातमी आहे. आरबीआयने असा नियम लागू केला आहे की ज्यामुळे तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वेळोवेळी बँकांच्या नियमांमध्ये बदल करते, ज्याचे पालन सर्व खातेदारांनी केले पाहिजे. या नियमाचे पालन न करणाऱ्यांना मोठा दंड भरावा लागतो, त्यामुळे आरबीआयच्या सर्व आवश्यक नियमांची माहिती प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे.

बँक खातेदारांना भरावा लागेल दंड
असे अनेक लोक आहेत जे अनेक बँकेत खाती खोलतात. परंतु यातील काही लोक आपल्या खात्यात पुरेसे पैसे ठेवत नाहीत. जेव्हा आपण खाते उघडतो तेव्हा आपल्याला सांगितले जाते की खात्यात किमान किती रक्कम ठेवावी लागेल.
परंतु अनेक लोक याकडे दुर्लक्ष करत असतात. पण आता असं केल्यास त्यांचं अकाऊंट माइनस होईल. त्यानंतर जेव्हा ते पैसे जमा करतील तेव्हा ते बँकेतून कापले जातील.
बँक किती दंड आकारेल ?
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण आपल्या खात्यात किमान शिल्लक ठेवली नाही तर बँक किती दंड आकारेल ? ते सर्व तुमच्या एरियानुसार अवलंबून आहे आणि हे शुल्क सर्व बँकांसाठी वेगवेगळे आहे. जर तुम्ही ग्रामीण भागातील असाल तर यावर कमी शुल्क आकारले जाईल, तर शहरी भागातील खातेदारांना जास्त दंड भरावा लागेल.
प्रत्येक बँकेत दंडाची रक्कम बदलली जाऊ शकते. त्यासाठी बँकेने स्लॅब तयार केला आहे. जर तुमचे असे बँक खाते नसेल ज्यात तुम्ही पैसे ठेवत नसाल तर लवकरात लवकर त्यात मिनिमम बॅलन्स टाका, अन्यथा तुमचे खाते मायनस होऊ शकते. त्यानंतर जेव्हा कधी तुमच्या खात्यात पैसे येतील तेव्हा ते बँकेतून कापले जातील. जर तुम्ही खाते वापरत नसाल तर ती खाती बंद केलेलं फायदेशीर ठरेल.