APY : सरकार सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी अनेक योजना सुरु करत असते. ज्याचा त्यांना खूप फायदा होतो. सरकारची अशीच एक योजना आहे, ज्यात तुम्हाला 7 रुपयांच्या गुंतवणुकीवर 5,000 रुपये पेन्शन मिळेल. कसे ते जाणून घ्या.
सरकारने सुरू केलेल्या या शानदार योजनेचे नाव अटल पेन्शन योजना असे आहे, ज्याद्वारे तुम्हाला मासिक आधारावर पेन्शन मिळेल. ही योजना अशी आहे की अगदी कमी गुंतवणुकीत तुम्हाला पेन्शन मिळते.
जाणून घ्या योजनेची खासियत
केंद्र सरकारने सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी अटल पेन्शन योजनेला सुरुवात केली असून आयकर संरक्षण देणारी केंद्र सरकारची एक जबरदस्त योजना आहे, जी प्रत्येकाच्या मनावर राज्य करत आहे. असंघटित क्षेत्रातील सर्व नागरिकांना लक्षात घेता या योजनेला सुरुवात केली आहे. कामगार किंवा असंघटित क्षेत्राच्या वृद्धापकाळाची काळजी घेण्यासाठी ही योजना खूप फायद्याची आहे.
हे लक्षात घ्या की तुम्हाला दर महिन्याला गुंतवणूक करावी लागणार आहे. समजा तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षापासून यात सामील होत असल्यास तुम्ही प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये पेन्शनसाठी सामील झाला तर तुम्हाला दरमहा 210 रुपये प्रीमियम भरावा लागणार आहे. यानुसार, तुम्हाला दररोज 7 रुपये गुंतवावे लागणार आहेत, हे लक्षात ठेवा.
समजा तुम्ही तेच पैसे गोळा करून तीन महिन्यांत जमा केल्यास तुम्हाला 626 रुपये जमा करावे लागणार आहेत. तुम्ही ते 6 महिन्यांत भरले तर तुम्हाला 1,239 रुपये जमा करावे लागतील. हे लक्षात घ्या की पेन्शन मिळवण्यासाठी तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी गुंतवणूक केली तर तुम्हाला 42 रुपये द्यावे लागणार आहेत.
दर महिन्याला किती मिळेल पेन्शन?
सरकारच्या या अटल पेन्शन योजनेचे उद्दिष्ट प्रत्येक विभागातील लोकांना या योजनेखाली आणणे आहे. या योजनेंतर्गत 1,000 ते 5,000 रुपयांपर्यंतचे पेन्शन लाभ मिळतात. समजा तुम्ही 6 महिन्यांत फक्त 1239 रुपये गुंतवल्यास तर तुम्हाला 60 वर्षांच्या वयानंतर तुमच्या उर्वरित आयुष्यासाठी प्रति वर्ष 60,000 रुपये देण्यात येतात.