Business ideas : ‘या’ झाडांची एकदाच करा शेती, ८० वर्षांपर्यंत होईल लाखो रुपयांची कमाई

Published on -

Business ideas : जर तुम्ही एखादा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला एक भारी आयडिया येणार आहोत. येथे एका अशा खास शेती बद्दल सांगणार आहोत की ज्यातून तुम्ही वर्षानुवर्षे चांगले उत्पन्न मिळवू शकता.

हे झाड एकदा लावल्यानंतर ८० वर्षे नफा मिळतो. हे कोणत्या प्रकारचे झाड आहे? ही Business idea काय आहे? जाणून घेऊया संपूर्ण माहिती –

तुम्ही कधी अशा झाडाबद्दल ऐकले आहे का जे एकदा लावल्यानंतर तुम्ही 80 वर्षांपर्यंत चांगले उत्पन्न मिळवू शकता? यामुळे आपल्याला बराच काळ भरपूर फळे मिळतात. याच्या मदतीने तुम्ही बिझनेस करू शकता आणि तुम्ही दीर्घकाळ कमाई करत राहाल. हे झाड आहे नारळाचे. नारळाचे झाड लावून त्याचे सातत्याने उत्पादन घेऊन तुम्ही चांगला नफा कमावू शकता.

* या झाडाला वर्षभर फळे येतात

नारळाचे झाड असे झाड आहे जे वर्षभर नवीन फळे देत राहते. यात अनेक वेगवेगळ्या प्रजातींचा समावेश आहे. ज्यामध्ये वर्षभर फळे येत राहतात. पिकलेली फळे पडताच नवीन फळे येत राहतात. हा क्रम वर्षभर अखंड चालू राहतो.

ही शेती करण्यासाठी महागडी खते किंवा कीटकनाशकांचीही गरज नसते. जास्त काळजी करण्याची गरज नाही. म्हणजेच तो तुमच्यासाठी उत्पन्नाचा एक खास स्त्रोत बनू शकतो, ज्यात तुम्हाला कमीत कमी पैसे गुंतवावे लागतील.

* नारळाची लागवड कशी करावी

जून ते सप्टेंबर महिन्यात नारळाची रोपे लावता येतात. जर तुम्हाला हे रोप लावायचे असेल तर तुम्हाला 9 ते 12 महिने झालेले रोपे लागतील. फक्त 6 ते 8 पाने असलेली वनस्पती निवडा आणि ही झाडे 15 ते 20 फूट अंतरावर लावा.

झाडे लावताना झाडांच्या मुळांभोवती पाणी साचणार नाही याचीही काळजी घ्यावी लागेल. पावसाळ्यातही पाणी साचू न देण्याची काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात तुम्ही नारळाचे झाड लावले तर ते तुमच्यासाठीही फायदेशीर ठरू शकते.

* नारळापासून उत्पादन

कुठेही नारळ विक्री करू शकता. नारळ पाणी बंद बॉटलमध्ये ठेऊन देखील त्याची विक्री करू शकता. अनेक देशांत सध्या बॉटलमध्ये नारळपाणी विक्री सुरु झाली आहे. नारळापासून इतरही प्रोडक्ट घेता येतात.

उदा. नारळ पावडर, नारळ दूध, नारळ दूध पावडर, कॉयर फाइबर, कोकोपीट आदींसारखे अनेक प्रोडक्ट बनवता येतील. अशा पद्धतीने तुम्ही नारळापासून लाखो रुपये कमावू शकता.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe