TVS Jupiter 125 SmartXonnect : भारी ! नवीन टीव्हीएस ज्युपिटर लॉन्च, खतरनाक ऍडव्हान्स टेक्नॉलजी, किंमतही बजेटमध्ये

Published on -

TVS Jupiter 125 SmartXonnect : टीव्हीएस मोटरने आताच्या फेस्टिवल सीजन मध्ये प्रगत फीचर्ससह ज्युपिटर 125 लाँच केली आहे. शी बाईक ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह सुसज्ज आहे. टीव्हीएस ज्युपिटर 125 च्या नवीन मॉडेलची किंमत 96,855 रुपये (एक्स-शोरूम) आहे.

ही टीव्हीएस स्कूटर आता एलिगंट रेड आणि मॅट कॉपर ब्राँझ या दोन नव्या कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. नवीन स्कूटरमध्ये अनेक अॅडव्हान्स कनेक्टेड फीचर्स देण्यात आले आहेत.

* किंमती मॉडेलवर अवलंबून असतात

नवीन मॉडेल लाँच झाल्यानंतर टीव्हीएस ज्युपिटर 125 आता तीन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. मॉडेल्सच्या आधारे तुम्ही तिन्ही स्कूटर्सच्या किंमती पाहू शकता.

मॉडेल                   किंमत (एक्सशोरूम)

Drum-Alloy           86 405 रुपये

Disc                      90 655 रुपये

SmartXonnect      96 855 रुपये

*नवीन स्कूटरमध्ये मिळतायेत हे ऍडव्हान्स फिचर्स

TVS Jupiter 125 च्या SmartXonnect मॉडेलमध्ये ब्लूटूथ-कनेक्‍टिव्हिटीसह सुसज्ज असलेला TFT डिजिटल क्लस्टर आहे. याशिवाय इंटिग्रेटेड मोबाईल चार्जिंगची सुविधा, ब्लूटूथ कनेक्टेड SmartXtalk आणि SmartXtrack सारखी प्रगत फीचर देखील यामध्ये उपलब्ध आहेत.

स्कूटरची ही सर्व एडवांस कनेक्टेड फीचर ड्रायव्हरला प्रवासादरम्यान अपडेट ठेवण्यास मदत करतात. यामध्ये असलेली इंटिग्रेटेड मोबाईल चार्जिंगची सुविधा अधिक चांगली बनवते. स्मार्टएक्सॉनेक्ट टीव्हीएस ज्युपिटर 125 मध्ये बरीच कार्यक्षमता प्रदान करते. स्कूटर चालक टीव्हीएस कनेक्ट मोबाइल अॅपद्वारे त्यांच्या अँड्रॉइड आणि आयफोनवरील सर्व कामे हॅन्डल करू शकतात.

* सेगमेंट फर्स्ट फीचर्स

टीव्हीएस ज्युपिटर 125 स्मार्टएक्सॉनेक्ट™ व्हेरियंटमध्ये अनेक सेगमेंट-फर्स्ट फीचर्स देण्यात आले आहेत. यात स्कूटर आता फॉलो-मी हेडलॅम्प आणि हॅझर्ड लाइट्स सुविधा आहे. यासोबतच मागे बसणाऱ्यास रायडर्सबॅकरेस्टही देण्यात आले आहेत.

टीव्हीएसने ज्युपिटर 125 च्या स्मार्ट कनेक्ट व्हेरियंटच्या माध्यमातून ग्राहकांना अपडेटेड, कनेक्टेड, स्मूद, कन्वीनियंट आणि सुरक्षित राइडिंग पर्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. टीव्हीएस मोटर कंपनीचे कॉर्पोरेट ब्रँड अँड डीलर ट्रान्सफॉर्मेशन,

कॉम्प्युटर्सचे उपाध्यक्ष अनिरुद्ध हलदर म्हणाले, ‘आजच्या व्यस्त जीवनात तंत्रज्ञानाशी जोडलेले राहणे अधिक फायदेशीर असून टीव्हीएस ज्युपिटर १२५ स्मार्टएक्सॉनेक्टची रचना गरजा लक्षात घेऊन करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe