New Rule : 31 ऑक्टोबरपूर्वी करा ‘हे’ महत्त्वाचे काम, नाहीतर बसेल आर्थिक फटका

New Rule

New Rule : अलीकडच्या काळात अनेकजण वेगवेगळ्या योजनांमध्ये पैसे गुंतवत असतात. जर तुम्हीदेखील पैसे गुंतवत असाल तर त्यापूर्वी या योजनेच्या जोखीमेची संपूर्ण माहिती करून घ्या. नाहीतर तुम्हाला नंतर खूप मोठा आर्थिक फटका देखील बसू शकतो.

म्युच्युअल फंड E KYC मध्ये गुंतवणूक करणे हे सर्वात सुरक्षित माध्यम मानले जाते. मागील काही दिवसापासून म्युच्युअल फंडांची मागणी पाहायला मिळत आहे. लोकांना आता त्यांच्या बचतीवर चांगला परतावा मिळतो. त्यामुळे जर तुम्ही म्युच्युअल फंडात पैसे गुंतवले असतील तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे.

करावे लागणार ई केवायसी

खरंतर, तुम्हाला तुमच्या म्युच्युअल फंडासाठी पुन्हा केवायसी करावे लागणार आहे. ज्यासाठी SEBI ने अनेक वेळा तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. परंतु यावेळी सेबी तुम्हाला आणखी वेळ देण्याची शक्यता नाही असे पाहायला मिळत आहे. कारण गुंतवणूकदारांना त्यांचे केवायसी पुन्हा सत्यापित करावे लागणार आहे, त्यांनी तसे केले नाही तर तुमचे खाते निलंबित केले जाण्याची शक्यता आहे.

असे करा E KYC

हे लक्षात घ्या की म्युच्युअल फंडातील E KYC साठी, तुम्हाला KRA वेबसाइटवर तुमचे पॅन कार्ड अपडेट करावे लागणार आहे. ते अपडेट केले गेले आहे की नाही हे तुम्हाला वेबसाइटवर पाहता येईल. त्यासाठी तुम्हाला लॉग इन करावे लागेल. समजा तुम्ही लॉगिनसाठी पासवर्ड विसरला असाल तर तुम्ही तो दिलेल्या ईमेल आयडीद्वारे बदलू शकता.

द्या ही माहिती

पॅन कार्ड अपडेट होताच तुम्हाला बँक तपशील आणि मोबाईल नंबर अपडेट करावा लागणार आहे. सर्व माहिती दिल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित तपासून पहा. त्यानंतर सबमिट वर क्लिक करून त्याच्या मदतीने तुम्ही तुमचे E KYC करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe