नाद खुळा ! BMW ने लॉन्च केल्या दोन नवीन कार , किंमत व फीचर्स पाहून वेडे व्हाल

Ahilyanagarlive24 office
Published:

BMW Latest Cars : जर्मन कार निर्माता कंपनी बीएमडब्ल्यूची एका वेगळीच हवा आहे. तिची क्रेझ नसेल असा तरुण सापडणं मुश्कीलच. आता BMW ने भारतात नवीन 740 डी एम स्पोर्ट (BMW 740d M Sport) आणि आय 7 एम 70 एक्सड्राइव्ह (BMW i7 M70 xDrive) लाँच केले आहेत. या वाहनांची किंमत अनुक्रमे 1.81 कोटी आणि 2.50 कोटी रुपये आहे.

नवीन बीएमडब्ल्यू 740डी एम स्पोर्ट ऑक्साइड ग्रे, मिनरल व्हाईट, ब्लॅक सफायर आणि बीएमडब्ल्यू इंडिव्हिज्युअल टॅन्झोनाइट ब्लू या कलरमध्ये उपलब्ध असेल. तर बीएमडब्ल्यू आय 7 एम 70 एक्सड्राइव्ह बीएमडब्ल्यू पर्सनल पेंटवर्कसह टू-टोन पेंटवर्कमध्ये उपलब्ध असेल, जे ब्लॅक नीलम रूफ किंवा ऑक्साइड ग्रे रूफ पेंटवर्क असू शकते.

BMW i7 M70 xDrive

ऑल इलेक्ट्रिक बीएमडब्ल्यू i7 M70 xDrive ही बीएमडब्ल्यूची पहिली ऑल-इलेक्ट्रिक एम कार आहे. यात 101.7kWhलिथियम-आयन बॅटरी पॅक आणि ट्विन मोटर सेटअप आहे. हा सेटअप 641 बीएचपी पॉवर आणि 1015 एनएम आउटपुट जनरेट करतो,

ज्यामुळे ही सर्वात शक्तिशाली इलेक्ट्रिक बीएमडब्ल्यू बनते. या सेटअपसह बीएमडब्ल्यूचा दावा आहे की, ही कार 560 किलोमीटरची रेंज देऊ शकते.

डिझाइन आणि फीचर्स

डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर i7 M70 xDrive मध्ये एम स्टाइल बंपर, साइड स्कर्ट, मिरर, अलॉय व्हील डिझाइन आणि रियर स्पॉयलर्स देण्यात आले आहेत. कारमध्ये स्वारोव्स्की क्रिस्टल हेडलाइट्स, ब्लॅक आऊट फ्रंट ग्रिल आणि ब्लू एएम कॅलिपर देखील देण्यात आले आहे.

केबिनमध्ये एम लेदर-लपेटलेले स्टीअरिंग व्हील आणि रूफ लाइनर, ड्युअल स्क्रीन सेटअप, मसाज फंक्शनसह हवेशीर सीट, रियर सीटवर थिएटर स्क्रीन असे अनेक फीचर्स आहेत.

BMW 740d M Sport

नवीन BMW 740d M Sport मध्ये 3.0-लिटर डिझेल इंजिन आहे, जे 8-स्पीड गिअरबॉक्ससह येते. हा सेटअप 282bhp आणि 650Nm जनरेट करू शकतो. इंजिन माइल्ड हायब्रिड प्रणालीसह सुसज्ज आहे. ही कार 6 सेकंदात ताशी 0-100 किमीचा वेग गाठू शकते.

तरुणांत क्रेझ

BMW ही अशी कंपनी आहे की अनेकांचे हे कार घेण्याचे स्वप्न असते. एक ब्रँड म्हणून या कडे पहिले जाते. एका वेगळीच क्रेझ तरुणाईमध्ये या कार ची दिसते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe