यूट्यूब व त्याद्वारे होणारी कामे याबाबत आता सर्वानाच माहिती झाली आहे. युट्युबर्स आजकाल भरपूर कमाई करत आहेत हेही तुम्ही ऐकलं असेलच. आज आम्ही तुम्हाला एका युट्यूबरबद्दल सांगणार आहोत ज्याने लहानपणी आपले पहिले यूट्यूब चॅनेल बनवले आणि मग… आज हाच मुलगा युट्युबच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावत आहे.
आज आम्ही तुम्हाला सुप्रसिद्ध युट्यूबर ‘कॅरी मिनाटी’ म्हणजेच अजय नागरबद्दल सांगणार आहोत. युट्यूबर ‘कॅरी मिनाटी’ने वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी यूट्यूबच्या दुनियेत प्रवेश केला आणि आज तो वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी लाखो रुपये कमावत आहे. युट्यूबवर कॅरी मिनाटी यांचे 40.5 मिलियन सब्सक्राइबर्स आहेत.
चॅनेलचे नाव बदलल्यानंतर नशीब बदलले- त्याचे मुख्य यूट्यूब चॅनेल 2014 पासून सक्रिय आहे. 2014 मध्ये नागर यांनी एडिक्टेडए1 नावाचे यूट्यूब चॅनेल सुरू केले, जिथे त्याने व्हिडिओ गेम क्लिप आणि व्हिडिओ पोस्ट केले.
यापूर्वी अजयने कोणताही विचार न करता आपले यूट्यूब चॅनेल सुरू केले तेव्हा त्याचे नाव CarryDeol होते, परंतु नंतर 2016 मध्ये त्याने आपल्या चॅनेलचे नाव बदलून CarryMinati असे केले. चॅनेलचं नाव बदलल्यानंतर झपाट्याने ग्रोथ झाली. अजय नागर यांची दिल्लीची स्टाईल आणि बोलण्याची पद्धत लोकांना आवडली.
महिन्याला कमवत आहे 25 ते 30 लाख रुपये –कॅरी मिनाटीच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याचे वार्षिक उत्पन्न अनेक कंपन्यांच्या सीईओंपेक्षा जास्त आहे. तो त्याच्या यूट्यूब व्हिडिओंमधून दरमहा सुमारे 25 ते 30 लाख रुपये कमवतो. तर, त्याचं वार्षिक उत्पन्न 3 ते 4 कोटींच्या आसपास आहे. कॅरी मिनाटी यांची संपत्ती सुमारे 40 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक आहे.
अजय नागर हा फरिदाबादचा रहिवासी आहे- अजय नागर यांचा जन्म 12 जून 1999 रोजी हरियाणातील फरिदाबाद येथे झाला. अजयने आपले शिक्षण दिल्ली पब्लिक स्कूलमधून पूर्ण केले. तो सध्या युट्युब मधून भरपूर कमावत आहे.