भारी ! बाजारात येणार ‘ही’ CNG बाईक ! भरपूर मायलेज, पहा सविस्तर माहिती

Ahmednagarlive24 office
Published:

Bajaj Bike : CNG वर चालणाऱ्या अनेक फोरव्हीलर तुम्ही पाहिल्या असतील. कमी किमतीत जास्त मायलेज देत असल्याने त्या अत्यंत लोकप्रिय झाल्या. पण आता दुचाकी बाईक देखील CNG मध्ये आली तर ? होय हे खरे आहे.

बजाज ऑटो ही भारतीय बाजारपेठेत सीएनजी बाइकचा पर्याय एक्सप्लोर करत आहे. ड्रायव्हिंगचा खर्च कमी करणे आणि प्रदूषण कमी करणे हे त्याचे उद्दीष्ट आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बजाज आता सीएनजी-कम-पेट्रोल बाइक्सवर काम करत आहे, ज्याचे अंतर्गत कोडनेम ब्रुजर ई101 आहे. ही बाईक आता डेवलपमेंटच्या शेवटच्या टप्प्यात आहे.

6 महिने ते 1 वर्षाच्या आत होईल लाँच ?- एका रिपोर्टनुसार, जर सर्व काही प्लॅननुसार झाले तर 6 महिने ते 1 वर्षात ही CNG बाईक बाजारात येऊ शकते. काही प्रोटोटाइप युनिट्स आधीच तयार करण्यात आले आहेत. ही 110 सीसीची बाईक असू शकते. सुरुवातीला औरंगाबाद आणि नंतर पंतनगर प्रकल्पात याचे उत्पादन करण्याचा कंपनीचा मानस आहे.

या सीएनजी बाईकचे नाव काय असेल?- त्यासाठी प्लॅटिना ब्रँड या नावाचा विचार केला जात आहे. बजाज ऑटोचे ईडी राकेश शर्मा यांनी मात्र याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे. “आम्हाला आमच्या पोर्टफोलिओमध्ये ‘स्वच्छ इंधना’चा वाटा वाढवायचा आहे, ज्यात ईव्ही, इथेनॉल, एलपीजी आणि सीएनजीच्या संपूर्ण स्पेक्ट्रमचा समावेश आहे असे ते म्हणाले.

राजीव बजाज यांचे वक्तव्य- एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत बजाज ऑटोचे एमडी राजीव बजाज म्हणाले, ‘कोणास ठाऊक, कदाचित सीएनजी बजाज मोटरसायकल लोकांच्या बाइक चालवण्याचा खर्च निम्मा करू शकते.’

CNG पर्यायामुळे खर्च वाचेल- बाइकमध्ये जर CNG व्हेरिएंट आले तर नक्कीच याचा फायदा होईल. आज पेट्रोल च्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे जर CNG पर्याय आला तर नक्कीच खर्चात बचत होईल. तसेच मायलेज देखील चांगले मिळेल. प्रदूषण समस्या देखील कमी होईल. हा देखील एक महत्वाचा मुद्दा ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe