Noise Buds X Prime : जबरदस्त फीचरसह बाजारात आले 120 तास टिकणारे इअरबड्स, किंमत आहे फक्त..

Noise Buds X Prime : सध्या इअरबड्सची क्रेझ निर्माण झाली आहे, बाजारात देखील शानदार फीचर्स असणारे इअरबड्स लाँच होऊ लागले आहेत. प्रत्येक कंपन्या आपल्या इअरबड्समध्ये वेगवेगळे फीचर्स उपलब्ध करून देत आहेत.

शिवाय त्यांच्या किमतीदेखील वेगळ्या आहेत. बाजारात आता Noise Buds X Prime इअरबड्स आले आहे. यात आपल्या ग्राहकांसाठी Noise अनेक शानदार फीचर्स उपलब्ध करून दिली आहेत. इतकेच नाही तर तुम्हाला 120 तासांची बॅटरी लाइफ मिळेल. जे तुम्ही अवघ्या 1,399 रुपयांना खरेदी करू शकता. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

जाणून घ्या Noise Buds X प्राइम किंमत

किमतीचा विचार केला तर भारतीय बाजारात नॉइज बड्स एक्स प्राइमची किंमत 1,399 रुपये आहे. इतकेच नाही तर अॅमेझॉनसोबतच कंपनीच्या gonoise.com या वेबसाइटवरून तो खरेदी करू शकता. हे बड्स ड्युअल-टोन फिनिशमध्ये येत असून तुम्ही ते तीन रंग पर्यायांमध्ये खरेदी करू शकता. सिल्व्हर ग्रे, शीन ग्रीन किंवा शॅम्पेन व्हाइट.

जाणून घ्या खासियत

नॉईज बड्स एक्स प्राइम क्वाड माइक पर्यावरणीय आवाज रद्दीकरण (ENC) सह सुसज्ज असून जो विशेषतः कॉलिंग दरम्यान स्पष्ट आवाज गुणवत्ता प्रदान करतो. यामध्ये 11 मिमी ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत. आले यात कंपनीने इअरबड्स जलद चार्ज करण्यासाठी InstaCharge तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे.

कंपनीचे असे मत आहे की या तंत्रज्ञानामुळे ते 10 मिनिटांच्या क्विक चार्जिंगमध्ये 200 मिनिटे प्लेटाइम मिळेल. इतकेच नाही तर इयरबड्स हायपरसिंक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून ज्यामुळे ते फोनपेक्षा जास्त वेगाने चार्ज होतात. हे बड्स ब्लूटूथ 5.3 आवृत्तीवर काम करते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe