Itel S23+ : Itel ने नुकताच आपला बहुप्रतीक्षित S23+ स्मार्टफोन बाजारात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन प्रत्येक बाबतीत खास आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे याची किंमत कोणत्याही एंट्री लेव्हल स्मार्टफोनइतकीच आहे,
एंट्री लेव्हल स्मार्टफोन असूनही त्याची तुलना मार्केटमधील सर्वात महागड्या स्मार्टफोन आयफोन 15 प्रो शी केली जात आहे. असं का घडतंय? तुम्हाला यामागचं कारण माहित नसेल तर आम्ही तुम्हाला त्याबद्दल सांगणार आहोत.
खरं तर याच्या डिझाइन आणि फीचर्समध्ये काही नवीन फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे त्याची तुलना आयफोन 15 प्रो शी केली जात आहे. यात डायनॅमिक आयलँडसारखी सारखी फीचर्स मिळत आहेत.
किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी आहे
आयटेलच्या S23+ स्मार्टफोनची किंमत 13,999 रुपये ठेवण्यात आली आहे. Itel S23+ हा देशातील सर्वात स्वस्त कर्व्ड डिस्प्ले स्मार्टफोन असल्याचे म्हटले जाते. या स्मार्टफोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची किंमत आणि त्या किमतीत मिळणारा कर्व्ड डिस्प्ले. हा कर्व्ह एमोलेड डिस्प्ले असलेला स्मार्टफोन आहे.
* आयटेल S23+ सर्वात स्वस्तातला कर्व्ड डिस्प्ले स्मार्टफोन
हा भारतातील सर्वात स्वस्त कर्व्ड डिस्प्ले स्मार्टफोन बनला आहे. हे खरेदी करण्यासाठी ग्राहकांमध्ये प्रचंड क्रेझ असेल, अशी कंपनीला आशा आहे. खरं तर कर्व्ह्ड डिस्प्ले असलेले स्मार्टफोन भारतात खूप ट्रेंडी आहेत आणि प्रत्येकाला ते विकत घ्यायचे असतात पण किंमतीमुळे ते शक्य झाले नाही, पण आता ग्राहकांना ते परवडणाऱ्या किमतीत खरेदी करता येणार आहेत.
डायनॅमिक आयलँडसारखी फीचर्स
एस 23+ मध्ये युजर्संना 50 एमपी रिअर कॅमेरा, 5,000 एमएएच बॅटरी, 6.7 इंचाचा एफएचडी डिस्प्ले, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट आणि 3डी कर्व्ड डिस्प्ले मिळेल. हे सर्व स्पेसिफिकेशन्स सामान्यत: 30,000 रुपयांच्या स्मार्टफोनमध्ये युजर्सना दिले जातात,
परंतु आता ते तुम्हाला 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळतील. आयटेल एस 23+ मध्ये अॅपलच्या डायनॅमिक आयलंड फीचरसारखेच फीचर्स आहेत. हे फीचर त्याला युनिक बनवणार आहे कारण आतापर्यंत या श्रेणीतील कोणत्याही स्मार्टफोनमध्ये हे सादर करण्यात आलेले नाही.
या स्मार्टफोनचा रिअर कॅमेरा सेटअप देखील आयफोन 15 प्रोच्या कॅमेरा सेटअपसारखा दिसतो. मात्र, यात केवळ ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे.