IRCTC Tour Package : जम्मू-काश्मीरच्या सौंदर्यकथा जगभर प्रसिद्ध आहेत. कदाचित म्हणूनच दरवर्षी लाखो लोक या ठिकाणी भेट देतात. जर तुम्ही काश्मीरला भेट देण्याचा विचार करत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.
आज आम्ही तुम्हाला आयआरसीटीसीच्या एका भन्नाट टूर पॅकेजची माहिती देणार आहोत. या टूर पॅकेजद्वारे तुम्ही परवडणाऱ्या किमतीत काश्मीरला भेट देऊ शकता, तर चला जाणून घेऊया या टूर पॅकेजची सर्व माहिती.

आयआरसीटीसीच्या या शानदार टूर पॅकेजचे नाव आहे काश्मीर पॅराडाईज ऑन अर्थ पॅकेज टूर एक्स अहमदाबाद. या टूर पॅकेजदरम्यान तुम्हाला अनेक ठिकाणांना भेट द्यायला मिळणार आहे. यामध्ये श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग आणि जम्मूचा समावेश आहे.
या दौऱ्याची सुरुवात अहमदाबाद येथून होणार आहे. हा दौरा 15 नोव्हेंबर 2023 पासून सुरू होणार आहे. हा दौरा 9 दिवस 8 रात्रीचा असेल. या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला ट्रेनने प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. थर्ड एसीमध्ये प्रवास करण्याची मुभा असेल.
या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला राहण्याची आणि जेवणासोबत अनेक सुविधा मिळणार आहेत. जर तुम्हाला हे टूर पॅकेज बुक करायचे असेल तर तुम्ही आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकता.
किंमतीबद्दल बोलायचे झाले तर हे टूर पॅकेज प्रति व्यक्ती 33,800 रुपयांपासून सुरू होईल. जर तुम्ही या टूरमध्ये एकटे प्रवास करत असाल तर त्यासाठी तुम्हाला प्रति व्यक्ती 42 हजार 100 रुपये खर्च करावे लागतील.
जर तुम्ही या टूरवर दोन लोकांसोबत प्रवास करत असाल तर त्यासाठी तुम्हाला प्रति व्यक्ती 35,500 रुपये खर्च करावे लागतील. तसेच 3 जणांनी एकत्र प्रवास केल्यास प्रति व्यक्ती 33 हजार 800 रुपये खर्च करावे लागतील.
5 ते 11 वयोगटातील मुलांसाठी बेडसाठी 25 हजार 200 रुपये आणि बेड नसलेल्या 5 ते 11 वयोगटातील मुलांसाठी 22 हजार 500 रुपये शुल्क आकारले जाते.