1 नोव्हेंबरपासून होतायेत ‘हे’ 4 मोठे बदल ! जाणून घ्या, फायद्यात राहाल

Ahilyanagarlive24 office
Published:

Maharashtra News : प्रत्येक महिन्याची सुरुवात काही नवीन बदलांसह होते. आर्थिक असतील किंवा शासकीय असतील, काही ना काही बदल होतच असतात. आता या महिन्याचे शेवटचे 5 दिवस राहिले आहेत. त्यामुळे आजपासून 5 दिवसांत नोव्हेंबर महिना सुरू होणार आहे.

त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या दिवसापासून तुम्हाला व्यवसायाशी संबंधित क्षेत्रात बदल दिसू शकतात, ज्याचा थेट परिणाम तुमच्यावर होणार आहे. चला तर मग 1 नोव्हेंबर 2023 पासून लागू होणाऱ्या 4 मोठ्या बदलांबद्दल जाणून घेऊयात –

जीएसटीमध्ये बदल

100 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त उलाढाल असलेल्यांनी 1 नोव्हेंबरनंतर 30 दिवसांच्या आत ई-चलन पोर्टलवर जीएसटी पावत्या अपलोड करणे आवश्यक आहे. जीएसटी प्राधिकरणाने सप्टेंबरमध्ये यासंदर्भातील अधिसूचना जारी केली होती. त्यामुळे चलन त्वरीत अपलोड करा, अन्यथा दंड आकारला जाऊ शकतो.

लॅपटॉप आयातीसाठी नवे नियम

सरकारने 30 ऑक्टोबरपर्यंत लॅपटॉप, टॅबलेट आणि पर्सनल कॉम्प्युटरच्या 8741 प्रकारच्या आयातीला सूट दिली होती. पण 1 तारखेपासून आता यात बदल होणार का? याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, नवे आयात कायदे 1 नोव्हेंबरपासून लागू होण्याची शक्यता आहे.

सेन्सेक्सवर आकारले जाणार शुल्क

मुंबई शेअर बाजाराने 20 ऑक्टोबर रोजी जाहीर केले होते की, 1 नोव्हेंबरपासून इक्विटी डेरिव्हेटिव्हसेगमेंटवर शुल्क लागू होईल. ज्याचा नंतर लहान गुंतवणूकदार आणि छोट्या व्यापाऱ्यांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो म्हणून त्याला विरोध करण्यात आला. मात्र, ते अजूनही सुरू च आहे.

Amazon ने Kinder Leader मध्ये बदल केले

Amazon ने म्हटले आहे की 1 नोव्हेंबर पासून, ते त्याच्या Kindle वरील काही सपोर्टेड फाइल्स काढून टाकत आहे, ज्यात MOBI (.mobi,azw, .prc) समाविष्ट आहे, त्यामुळे Kindle यूजर्स ज्यांना MOBI (.mobi,azw, .prc) फाइल्स पाठवण्यासाठी वापरत होते, त्यांना त्रासाला सामोरे जावे लागू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe