Ahmednagar News : नव-याची दारू सोडायची असेल तर प्रवरा नदीपात्रात फेरी करावी लागेल, असे सांगून महिलेला नदीपात्रात नेऊन तिच्यावर एकाने अत्याचार केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास तालुक्यातील खांडगाव येथील नदीपात्रात छ पाडली.
संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील एका महिलेच्या पतीला दारूचे व्यसन आहे. याबाबत तिने खांडगाव येथील पप्पू आव्हाड याला सांगितले.
नव-याची दारू सोडायची असेल तर प्रवरा नदीपात्रात फेरी करावी लागेल, असे सांगून आव्हाड याने सदर महिलेला त्याच्या सोबत नदीपात्रात नेले. नदीपात्रात आव्हाड याने सदर महिलेस कपडे काढण्यास सांगितले.
त्याच्या सुचनेनुसार या महिलेने अंगावरील साडी काढली. आरोपीने लिंबू व नारळ खाली ठेवून फेरी मारण्यास सांगितले. महिला फेरी मारत असताना आव्हाड याने तिला खाली पाडून तिच्यावर बळजबरी अत्याचार केला.
त्यानंतर तो पळून गेला. याबाबत सदर महिलेने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी पप्पू आव्हाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यादव हे करीत आहे.