रेल्वे प्रशासनाकडून होणारी कारवाई थांबवल्याबद्दल मंत्री विखेंचा सन्मान

Ahmednagarlive24 office
Updated:
Maharashtra News

Maharashtra News : रेल्वे प्रश्नाच्या निवेदनासंदर्भात महसूलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी संपर्क साधून रेल्वेने जागा धारकांना दिलेल्या नोटीसीतील कारवाईबाबत मध्यस्थी घडवून आणावी,

अशी मागणी त्यांच्याकडे केली होती व विस्थापित होऊ पाहणाऱ्या नागरिकांशी चर्चा करून तडजोड घडून आणावी, असेही त्यांनी सांगितले. याबद्दल नुकताच त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

यावेळी कामगार नेते नागेश सावंत, आपचे नेते तिलक डुंगरवाल, संजय गांगड, विकास डेंगळे, नाना गांगड, प्रशांत कटके, राहुल रणपिसे, युवराज घोरपडे, सोनाबाई रजपूत, मुबारक शेख, प्रवीण जोजारे, मेहबूब शेख, अलीम शेख,

रामनानी, मोहन अग्रवाल, गणेश कटके, प्रसाद कटके, मुबारक शेख, सुरेखा लोळगे, मंगल लोळगे, मनीषा मोरे, लिलाबाई थोरात, मायावती शिरसाठ, सुशीला सुपेकर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

येथील रेल्वे लाईनपरिसरामधील उत्तर व दक्षिण भागातील अनेकांना रेल्वे प्रशासनाने अतिक्रमण जागा असल्याच्या नोटीसा देऊन सदरच्या जागा ताब्यात घेण्याच्या घाट घातला होता. तसेच नव्याने प्रस्तावित रेल्वे माल धक्क्यामुळे नेवासा रोड वरील अनेक घरे व दुकाने रेल्वे प्रशासन काढणार होती. त्यामुळे आम्हाला विस्थापित करू नका, या मागणीचे निवेदन नुकतेच मंत्री विखे पाटील यांना दिले होते.

तेथील माल धक्क्यामुळे उडणाऱ्या सिमेंट मिश्रित धुळीमुळे विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले होते. त्यामुळे वरील परिसरातील सर्व व्यापारी रहिवासी यांच्यामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या विस्थापित होऊ पाहणाऱ्या सर्व नागरिकांनी कामगार नेते नागेश भाई सावंत, आपचे नेते तिलक डुंगरवाल, शिवसेनेचे नेते सचिन बडदे, संजय गांगड, विकास डेंगळे यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी जनआंदोलन उभे केले होते.

याची दखल स्थानिक भाजपा नेते तालुकाध्यक्ष दीपक पटारे, नितीन दिनकर यांनी घेऊन यांच्या नामदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्याशी संपर्क साधून रेल्वे प्रशासनामुळे विस्थापित होऊ पाहणाऱ्या नागरिकांच्या वतीने चर्चा घडवून आणली होती. या संदर्भामध्ये नामदार रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी नागरिकांची बैठक घेण्यात आली.

त्यावेळेस नामदार दानवे यांनी विखे पाटील यांच्या मागणीनुसार रेल्वे प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कारवाई करू नका, असे संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे सण उत्सवाच्या काळात आपले घर दुकान जाते की काय,

अशा भीतीच्या वातावरणामध्ये असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. रेल्वे खात्याकडून होणारी कारवाई थांबवली म्हणून विस्थापित होऊ पाहणाऱ्या नागरिकांनी पूर्व भागाच्या दौऱ्यावर असलेल्या महसूलमंत्री विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe