अल्पवयीन मुलीला पाठविले अश्लील फोटो ! तरुणावर गुन्हा दाखल

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील एका अल्पवयीन मुलीला मोबाईलवर अश्लील फोटो पाठवणाऱ्या तरुणावर पोक्सो कायद्यान्वये काल रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे बेलापूरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बेलापूर बुद्रुक – गावातील आरोपी योगेश साहेबराव पवार (रा. नवले गल्ली, बेलापूर बुद्रुक) याने

१५ वर्षीय अल्पवयीन मुलीला सहा महिन्यापासून पाठलाग करून तिच्या मोबाईलवर स्वतःचे अश्लील फोटो पाठवून तिचा विनयभंग केला.

याप्रकरणी पिडीत अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरुन येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांनी कुणाच्याही दबावाला बळी न पडता आरोपीची कसून चौकशी करावी.

त्याच्या मोबाईलमध्ये आणखी काही मुलींची माहिती आहे का? याचाही शोध घेण्याची मागणी पालकांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe