Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींचे निवडणूक कौल हाती आली असून यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये सरपंचपदी वर्णी लागल्याचे चित्र आहे.
त्याचबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेस व स्थानिक विकास आघाडी यांनादेखील काही ग्रामपंचायतींमध्ये यश मिळाले आहे.
याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की राहुरी तालुक्यामध्ये २२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये येणाऱ्या १६ तर उत्तर मतदारसंघामध्ये येणाऱ्या सहा ग्रामपंचायतींचा समावेश होता.
ज्यामधील जवळपास बहुसंख्य ग्रामपंचायती या स्थानिक पातळीवर लढल्या गेल्या असल्या, तरी निवडणूक संपल्यानंतर आपल्या आपल्या पक्षाच्या संदर्भामध्ये सरपंचांनी दावा केला असून यामध्ये भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात यश आलेले दिसते. दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर ब्राम्हणी, म्हैसगाव, यासारख्या मोठ्या ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात गेल्याचे चित्र आहे.
त्याचबरोबर उत्तरेतील चिचोली ही ग्रामपंचायतदेखील भारतीय जनता पार्टीकडे गेलेली आहे; मात्र असे असताना बारागाव नांदूर येथील सत्ता राष्ट्रवादीने टिकवून ठेवण्यामध्ये यश मिळवलेले आहे. मुसळवाडी या ठिकाणीदेखील राष्ट्रवादीने सत्ता टिकवली आहे.
भारतीय जनता पार्टीकडे ब्राम्हणी, म्हैसगाव, डिग्रस, कानडगाव, निभेरे, धामोरी बुद्रुक, शिलेगाव, चिंचोली, माहेगाव, गंगापूर या ग्रामपंचायती गेल्या असून या गावचे सरपंच भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत.
बारागाव नांदूर, मोमीन आखाडा, घोरपडवाडी, दरडगाव थडी, मुसळवाडी, तमनर आखाडा याठिकाणी राष्ट्रवादीचे सरपंचपदाचे उमेदवार निवडून आलेले आहेत. टाकळीमियाँ या ठिकाणी चुरशीच्या निवडणुकीमध्ये स्थानिक विकास आघाडीचे उमेदवार निवडून आलेले आहेत. सडे या ठिकाणी सरपंचपदाचा उमेदवार भारतीय जनता पार्टीचा निवडून आला असला तरी त्यांच्याबरोबर आघाडी करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सदस्य पदासाठी निवडून आलेले आहेत.
ब्राह्मणी येथे झालेल्या चुरशीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे; मात्र या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य जास्त प्रमाणात निवडून आलेले आहेत. देसवंडी येथे विद्यमान सत्ताधाऱ्यांना आपली सत्ता गमावली लागली आहे. तर चिंचोली येथे विखे गटाच्या दोन गटांमध्ये निवडणूक भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या ठिकाणी निवडून आलेला आहे.
निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे : टाकळीमियाँ सरपंच लीलाबाई चंद्रकांत गायकवाड २३०१ सदस्य प्रताप निमसे- ५३४, नीता प्रभाकर सगळगिळे- ४९५, शीतल अरुण बर्डे ४८०, दिलीप गोसावी- ६२८, कौशिनाथ शिंदे- ७२४, शीला मोरे-६६५, भास्कर जुंदरे ६३६, संदीप चिंधे ६७७, रवींद्र मोरे-५२१, विमल म्हसे ५२१, शफीक शेख- ४१, ऊध्दव शिंदे-६३१, सुवर्णा शिंदे-६२३, शिवनेरी शिंदे- ७९१, अजय जगधने ६७९, ज्योती तोडमल-५८९, सुरेश निकम ६१८.
धानोरी खुर्द सरपंच सुवर्णा मच्छिद्र सोनवणे-५२५, सदस्य अमोल आडसुरे- २०८, सुनील पवार बिनविरोध, निर्मलाबाई भाऊसाहेब कदम २०५ अंकुश कैलास पारखे- १६५, निलेश सोनवणे- १६६, विमल वसंत थोरात १६०, विलास हरिचंद्र – १९४, उपा शंकर जाधव १८७, मनिषा भारत कलापुरे- १९१.
म्हैसगाव सरपंच सुजाता अरुण पवार- ७१४, शिवाजी बर्डे -२५३, अमोल यादव २७७, मंदाबाई पोपट आंग्रे ३७८, भाऊसाहेब गागरे ३७९, प्रमिला सीताराम पारधे ३५७, उज्वला दीपक बेलकर ३२२. भास्कर दुधाट ३३४, रंजना नानासाहेब विधाटे ३४०, वंदना नामदेव जाधव-३०९.
सडे सरपंच सविता सर्जेराव पानसंबळ- १३६६, सदस्य मच्छींद्रनाथ धोंडे २७६, सिंधुबाई अरुण फाटक- २९५, कांचन सुनील पानसंबळ-२८८, धनंजय पानसंबळ ३७६, हिराबाई सुभाष शिंदे-३७१, काजल हिरामण साळवे-३३६, विठ्ठल धोंडे २७३, अर्चना संदीप देठे २६३, सागर नन्नवरे ४५५, अनिल बर्डे – ३९४, वंदना दिलीप धोंडे ४६१.
बारागाव नांदुर सरपंच प्रभाकर गाडे २१२७, सदस्य श्याम गाडे ४३२, अनुराधा खंडू मंडलिक-४३१, शितल अशोक आंधळे ५०९, राजेंद्र घाडगे ५०५, मंगल संजय बर्डे – ४१६, सोनाली विठ्ठल गाडे – ४४२, हबीब देशमुख- ४८९, सुरेखा अशोक धनवडे-३८४, योगेश साळवे ४५०, सचिन कोहकडे ५२९, रुक्मिणी विठ्ठल पारधी ४६२, राम शिंदे- २४६, कलावती संभाजी केंद्रे २५७, सलीम शेख २७३, पद्मा तबाजी पवार- ३४३, रेहान देशमुख- ३४६. निभेरे सरपंच भाऊसाहेब सिनारे-

८२६, सदस्य वैभव साबळे- २४८, सुभाष सोनवणे-३३३, मनीषा योगेश आंधळे-३३९, हर्षदा नीलेश सांगळे – ३९०, थॉमस चोखर- ३४६, सुभाष सिनारे- ४३२, जयश्री अमोल सिनारे-३४५, संतू नाकोडे २१५, अस्मिता किशोर व्यास-३६९, मंगल गोरक्षनाथ सिनारे- ३३५.
माहेगाव सरपंच स्वाती संदीप कवडे ७५७, सदस्य संजय थेवकर- १५७. संगीता भीमराव डेरे- १६०, छाया निवृत्ती देठे १६७, संदीप गाडे २१७, ताराबाई बाळासाहेब गोलवड – २१७, वंदना दत्तात्रय आढाव २३५, रवींद्र पवार- ४३२, पांडुरंग देठे ४२२, कविता गणेश थेडकर- ४२२.
मालुंजे खुर्द सरपंच गंगुबाई जालिंदर पवार ७०५ सदस्य किशोर पवार २०७, सविता आप्पासाहेब गायकवाड १९०, कामिनी जगदीश लोखंडे १८६, राहुल पवार- २६४, संदीप सोळंके – २६४, गंगुबाई राधाकृष्ण बोरुडे- २६६, बाळासाहेब सोळंके २१७, ज्योती मच्छिद्र पवार २२१, भारती मच्छिद्र रिंगे- २२१.
गंगापूर सरपंच उषाताई एकनाथ नान्नोर २९४ सदस्य रवींद्र कोळसे- १३५ आश्विनी अनिल काळे- १११, बाळकृष्ण कातोरे – ३०३, रंजना भाऊसाहेब भुजबळ ३०७, वर्षा महेश भुजबळ ३०२, किशोर नान्नोर – १९५, सुवर्णा संतोष काळे.
मुसळवाडी सरपंच कुसुम रामचंद्र खरात ७७१, प्रमोद घोलप ३८८, अर्चना मच्छिद्र धुमाळ – ३५६, वर्षा विजय कुलकर्णी- ३५१, विठाबाई गोकुळदास जाधव-३५१. नितीन बाळासाहेब धुमाळ- १६२, माधुरी प्रदीप भुजाडी १३९, बाबासाहेब निकाळजे- २४७, चंद्रकला गोविंद जाधव- २४७, वर्षा श्रीकांत माने २१७.
डिग्रस सरपंच: रेणुका कुंडलिक गावडे- ९९६, सदस्य रामनाथ गावडे १९३, कुसुम जगन्नाथ गावडे – १९६, अमोल बेलेकर- १८५, सुनिता अनिल पवार- १५५, उपा विश्वनाथ पवार २९३, रावसाहेब पवार- १९९. संदीप गावडे- १९४, मंगल सुभाष बेलेकर १७१, रमेश पारधे – २३१, ज्योती सतीश घोरपडे २८७, जयश्री प्रवीण भिंगारदे २८७, अनिल शिंदे-२५२, दिलीप पवार – २२०, प्रतिभा संदीप कोकाटे-२३४, राजू कसबे- १६९, गोरख घुले-१२५, साक्षी संजय नान्नोर – १४२.
मोमीन आखाडा सरपंच : विमल रावसाहेब शिंदे ७८९, सदस्य अशोक कोहकडे ३१७, मीराबाई दत्तात्रय कदम- ३३४, मनीषा नानासाहेब कोहकडे ३१३, – रावसाहेब शिंदे २६३, वसीम शेख २७४, सुगरबी तलीफ शेख २६२, मच्छिद्र कदम- २७६, ताराबाई राजेंद्र शिंदे-२५३, रंजना चांगदेव शिंदे-२५४.
■पिंपरी वळण येथे युवा नेते रामचंद्र राजूभाऊ शेटे यांनी बिनविरोध सरपंचपदासह सदस्य निवडून आणल्याने एक हाती सत्ता काबीज केली आहे. ब्राम्हणी येथे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुरेश बानकर यांच्या पत्नी सुवर्णा बानकर निवडून आल्या आहेत; मात्र सदस्यपदावर विरोधी पक्षाचे सदस्य जास्त निवडून आले आहेत.
टाकळीमियाँ येथे लिलाबाई रामचंद्र गायकवाड या सरपंच पदासाठी निवडून आल्या आहेत. अपक्षाची उमेदवारी विरोधी गटाला महागात पडली असून अपक्ष उमेदवार या निवडणुकीमध्ये दोन नंबरवर राहिलेला आहे.