संगमनेर तालुक्यात शॉर्टसर्किटमुळे सव्वा दोन एकर ऊस जळला

Published on -

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील चिंचपूर खुर्द येथील शेतकरी पार्वताबाई कारभारी तांबे यांचा सुमारे ९० गुंठे ऊस जळून खाक झाला आहे. त्यामुळे तांबे यांचे अंदाजे ३ लाखांचे नुकसान झाले आहे.

याबाबत स्थानिक नागरिकांकडून समजलेली माहिती अशी की, चिंचपूर खुर्द गावातील गट नंबर ४० मध्ये पार्वताबाई कारभारी तांबे यांचे उसाचे क्षेत्र आहे. शुक्रवारी अचानक पणे दुपारी ३ वाजेच्या सुमारास तांबे यांच्या उसाच्या शेतात शॉटसर्कीट झाल्यामुळे या ऊस क्षेत्राला आग लागली.

आगीचे व धुराचे लोळ हवेत दिसू लागल्याने भारत तांबे, नकुल तांबे, रमेश थेटे, बाळासाहेब तांबे, सिताराम ताबे, आप्पासाहेब तांबे, कृष्णा तांबे, रामा सावंत, सागर तांबे, रंगनाथ तांबे, चिमाजी गाडेकर, सागर पवार आदींसह

पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखान्याच्या अग्निशामक बंब यांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करत ही आग विझवण्यात यश मिळवले आहे. यामुळे परिसरातील ऊस तसेच इतर शेती पिकाची मोठी वित्तहानी टळली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!