‘असे’ सरले 2023 वर्ष ! पूर,भूकंपापासून तर भूसख्खलन पर्यंत…’इतके’ हजार मृत्यू, पहा वर्षभरात आलेली संकटे व झालेलं नुकसान

Published on -

वातावरणात प्रचंड बदल होत चालला आहे. निसर्गाचा, पर्यावरचा ऱ्हास होत असल्याने निसर्गाचाच समतोल दःसळु लागला आहे. आगामी काळात हे संकटे अधिक गडद होत जातील असे जाणकार सांगतात. सण २०२३ चा विचहर केला तर भारत देशात प्रचंड नैसर्गिक संकटे आली.

वातवरण विषम राहिले. भूकंप, पूर, अवकाळी पाऊस आदी संकटांमध्ये हजारो घरे पडली तर हजारो मृत्यू झाले. जानेवारी ते सप्टेंबर पर्यंत दररोज संकटे येत होती. चला वर्षभराच्या आकडेवारीवर व संकाटावर नजर टाकुयात

नऊ महिन्यांत दररोज संकटे

जानेवारी ते ९ सप्टेंबर या नऊ महिन्यांत देशाने खूप संकटे पाहिली. दररोज कोणत्या ना कोणत्या नैसर्गिक संकटांना तोड दिले. ‘डाऊन टू अर्थ’ च्या आकडेवारीनुसार या नऊ महिन्यात या संकटामुळे २ हजार ९२३ जणांचा मृत्यू झाला. २८.४ लाख हेक्टर भागातील कृषी क्षेत्राला फटका बसला. धक्कादायक आहे पण वास्तव आहे.

हिमाचल प्रदेशात संकटांची मालिका, देशातील पशुधनाचा मृत्यूचा आकडाही भयंकर

नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेली आकडेवारी पाहिली तर सर्वाधिक १५,४०७ घरे हिमाचल प्रदेशात उ‌द्ध्वस्त झाली. देशात एकूण १२,५१९ पशुधनाचा मृत्यू झाला. यातील ६० टक्के मृत्यू पंजाबमध्ये झाले.

वीज, वारा, पाऊस

मान्सूनपूर्व काळात वीज, वादळ, गारांनी झोडपून काढणे अशा अनेक असामान्य घटना घडल्या. ९२ पैकी ७९ दिवस वीज-वादळे झाली. २८ दिवस उष्णतेची लाट, १६ दिवसांत मुसळधार पाऊस, पूर, भूस्खलनच्या घटना घडल्या. यात महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसल्याचे आकडेवारी सांगते.

मान्सून काळ कसा राहिला?

देशात साधारण ३० जूनपर्यंत मान्सून सक्रिय झाला. चक्रिवादळामुळे पश्चिमेकडील राज्यात मुसळधार पाऊस झाला, जुलैमध्ये हिमाचलमध्ये पूर आला. मान्सूनच्या १२२ दिवसांत (जून ते सप्टेंबर) अनेक अतिविषम
घटना घडल्या. यात जवळपास २,५९४ पेक्षा जास्त मृत्युसह नोंद झाली.

निसर्गाचाही समतोल ढासळतोय

सध्या मानव निसर्गावर अतिक्रम करत आहे. निसर्गाचा ऱ्हास होत आहे. याचाच परिणाम निसर्गावर होत असून विषम घटना घडत आहेत. त्यामुळे आगामी काळातील संकटे पाहता सर्वांची सावध पावले उचलायला हवीत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe