Cheque Bounce : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये डिजिटल पद्धतीने पैशांचे व्यवहार होऊ लागले आहेत. डिजिटल पेमेंट मुळे पैशांचे व्यवहार आधीच्या तुलनेत निश्चितच सोपे झाले आहेत. डिजिटल व्यवहारासाठी, यूपीआय पेमेंट साठी बाजारात वेगवेगळे एप्लीकेशन उपलब्ध आहेत.
फोन पे, गुगल पे, पेटीएम, अमेझॉन पे अशा नानाविध एप्लीकेशनचा वापर करून यूपीआय पेमेंट केले जात आहेत. त्यामुळे देशातील कोणत्याही कोपऱ्यात राहणाऱ्या व्यक्तीला सहजतेने पैसे पाठवता येत आहेत. एवढेच नाही तर डिजिटल पेमेंट एप्लीकेशनचा वापर करून भविष्यात विदेशातील लोकांना देखील पैसे पाठवता येणार आहेत. यासाठी सद्यस्थितीला प्रयत्न सुरू असल्याचे वृत्त समोर आले आहे.
मात्र असे असले तरी आजही पैशांच्या व्यवहारासाठी चेक अर्थातच धनादेशचा मोठा प्रमाणात वापर होतो. दरम्यान जर तुम्हीही चेकने पेमेंट करत असाल किंवा पेमेंट स्वीकारत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे. कारण की आज आपण चेकने पेमेंट करणाऱ्या व्यक्तींसाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन हजर झालो आहोत.
आज आपण जर एखाद्या व्यक्तीने चेक दिला आणि तो चेक बाउन्स झाला तर सदर व्यक्तीवर काय कारवाई होऊ शकते याविषयी माहिती पाहणार आहोत. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार चेक बाऊन्स झाल्यास खात्यातून दंड म्हणून रक्कम कापली जाते. चेक बाऊन्स झाल्याबद्दल चेक देणाऱ्याला कळवावे लागणार आहे. मग चेक देणाऱ्या व्यक्तीला एका महिन्यात पैसे द्यावे लागतात.
जर एका महिन्याच्या आत पैसे दिले नाहीत तर त्याला कायदेशीर नोटीस पाठवली जाऊ शकते. त्यानंतरही त्याने १५ दिवस कोणतेही उत्तर दिले नाही तर अशा व्यक्ती विरोधात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट १८८१ च्या कलम १३८ अन्वये गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.
खरेतर आपल्या भारतात चेक बाऊन्स होणे हा दंडनीय गुन्हा असून त्यासाठी कलम १३८ अन्वये गुन्हा दाखल करता येतो. चेक बाउन्स झाल्यास दंड किंवा दोन वर्षांचा कारावास किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. अशा प्रकरणांमध्ये, चेक देणाऱ्या व्यक्तीस 2 वर्षांची शिक्षा भोगावी लागते आणि व्याजासह रक्कमही भरावी लागते.