Heart Beats: आराम करत असताना हृदयाची गती किती असावी? नाडी तपासून हृदयाची गतीचा अंदाज कसा घ्यावा? वाचा माहिती

Ahmednagarlive24 office
Published:

Heart Beats:- हृदय म्हटले म्हणजे हा आपल्या शरीरातील सगळ्यात व्यस्त आणि संवेदनशील अवयव म्हणून ओळखला जातो. त्यामुळे महत्त्वाच्या अशा या अवयवाची काळजी घेणे खूप गरजेचे असते. सध्या आपण पाहत आहोत की हृदयविकाराच्या झटक्याच्या प्रमाणामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे.

जिम मध्ये वर्कआउट करत असताना किंवा खेळताना किंवा काही कार्यक्रम सादर करताना देखील अचानकपणे हृदयविकाराचा झटका येऊन व्यक्ति मृत्युमुखी पडण्याच्या घटना आपण अनेक व्हिडिओंच्या माध्यमातून पाहिले असतील. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आपले हृदय नेमके कसे काम करते हे समजून घेणे खूप गरजेचे आहे.

यामध्ये हृदयाची गती म्हणजेच हृदयाची धडधड या गोष्टीला खूप महत्त्व असून याकडे नीटपणे लक्ष देणे गरजेचे आहे. हृदयाची गती म्हणजे काय हे जर आपल्याला समजून घ्यायचे असेल तर कमीत कमी पाच लिटर रक्त पंप करण्यासाठी एका मिनिटांमध्ये हृदय किती वेळा धडधडते याचे मोजमाप म्हणजेच हृदयाची गती असे आपण म्हणू शकतो.

साधारणपणे आवश्यक रक्त पंप करण्याकरिता हृदयाचे एका मिनिटांमध्ये 60 ते 70 ठोके पडत असतात. परंतु आवश्यक रक्त पंप करण्यासाठी तर यापेक्षा जास्त हृदयाचे ठोके पडत असतील तर मात्र जर हृदय पूर्णपणे निरोगी किंवा कार्यक्षम आहे असे आपण म्हणू शकत नाही.

नाडी तपासून घेता येतो हृदयाच्या गतीचा अंदाज

समजा तुम्ही आराम करत आहात किंवा कुठलाही ताण-तणाव किंवा दगदग नाही अशावेळी हृदयाची गती तपासणे गरजेचे ठरते व याकरिता तुम्ही तुमचे मनगट हलक्या हाताने दाबल्यावर एका मिनिटांमध्ये तुमच्या नाडीचे किती बिट्स तुम्हाला जाणवत आहेत हे पाहणे महत्त्वाचे आहे.

पंधरा सेकंदात तुम्ही बीट्स मोजून नंतर त्याला चारने गुणून तुम्हाला तुमच्या हृदयाच्या गतीचा अंदाज घेता येतो. या पद्धतीने हृदयाची गती मोजण्याकरिता सकाळी लवकर किंवा तुम्ही अगदी जेव्हा झोपेतुन उठता तेव्हा अंथरुणावरच नाडी तपासणे गरजेचे आहे.

तुम्ही आराम करत असताना किंवा विश्रांती करत असताना हृदयाची धडधड किती असावी?

हृदयाची नेमकी आरोग्याची स्थिती कशी आहे हे तुमचे तंदुरुस्ती किंवा आरोग्याची स्थिती तसेच शारीरिक हालचाल किती होते यावर प्रमुख्याने अवलंबून असते. ज्या व्यक्तींच्या हृदयाची सहनशक्ती आणि पंपिंग क्षमता उत्तम आहे त्यांचे हृदय 40 ठोके प्रति मिनिटात आवश्यक रक्त पंप करू शकते. अशा हृदयाला स्थिर अशी पंपिंग क्रिया चालू ठेवण्याकरिता जास्त मेहनत करावी लागत नाही.

मात्र जर तुम्ही शारीरिक दृष्टीने आवश्यक तेवढे सक्रिय नसाल आणि तरी देखील तुमचे हृदयाचे ठोके कमी असतील तर तुम्ही हृदयरोग तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. समजा तुम्ही आराम करत असताना तुमच्या हृदयाची गतीप्रती मिनिट शंभर बीटच्या वर असेल तर ही चिंताजनक बाब आहे. त्यावर झालेल्या अभ्यासावरून दिसून आले आहे की, तुम्ही विश्रांती घेत असताना जास्त असणारे हृदयाची गती कमी शारीरिक तंदुरुस्ती तसेच हाय ब्लड प्रेशर आणि शरीराचे अधिक वजन यांच्याशी संबंधित आहे.

हृदयाची गती शंभर बिट्स प्रति मिनिट पेक्षा जास्त असल्यास काय होऊ शकते?

हृदयाची गती शंभर बिट्स प्रति मिनिट पेक्षा जास्त असेल तर टाकीकार्डीया होण्याची शक्यता असते. यावर जर योग्य उपचार केले नाहीत तर गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. यामध्ये रक्ताच्या गुठळ्या होणे तसेच हृदय बंद पडणे किंवा अचानक मृत्यू ओढवणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात. थकवा तसेच हृदयाची ठोके अचानक प्रचंड वाढणे अशा लक्षणांकडे काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे.

वयानुसार असलेली हृदयाची गती

वयानुसार हृदयाची गती सुद्धा बदलणे गरजेचे आहे. उदाहरणच घ्यायचे झाले तर मुलांसाठी शंभर ते दीडशे बिट्स प्रति मिनिट, प्रौढ व्यक्तींमध्ये 60 ते 100 बिट्स प्रति मिनिट, एक ते तीन वर्षाच्या मुलांकरिता 70 ते 110 बिट्स प्रति मिनिट आणि बारा वर्षांच्या मुलांकरिता 55 ते 85 बिट्स प्रति मिनिट इतकी हृदयाची गती असणे गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe