कोयता गँगचा अहमदनगरमधील कायनेटिक चौकात धुमाकूळ, तिघे चौघे आले आणि सपासप सपासप सुरु झाले….

कोयता गँग व त्याची दहशत पुण्यात जास्त प्रमाणात पाहायला मिळाली. परंतु आता अहमदनगर जिल्ह्यातही कोयता गॅंग दहशत करण्याचा प्रयत्न करताना दिसतेय. अहमदनगरमधील कोयता गँगच्या काही घटना ताजा असतानाच आता कायनेटिक चौक परिसरात काळजाचा थरकाप उडवणारा कोयता गँगचा धुमाकूळ समोर आलाय.

Ahmednagarlive24 office
Published:
koyata

Ahmednagar News : कोयता गँग व त्याची दहशत पुण्यात जास्त प्रमाणात पाहायला मिळाली. परंतु आता अहमदनगर जिल्ह्यातही कोयता गॅंग दहशत करण्याचा प्रयत्न करताना दिसतेय.

अहमदनगरमधील कोयता गँगच्या काही घटना ताजा असतानाच आता कायनेटिक चौक परिसरात काळजाचा थरकाप उडवणारा कोयता गँगचा धुमाकूळ समोर आलाय. हा थरारक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली.

नगर पुणे रोड वरील कायनेटिक चौक येथे रात्रीच्या सुमारास हे तिघे चौघे कोयताधारी गुंड आले व त्यांनी तेथे असणाऱ्या चहाच्या टपऱ्या पाडून दिल्या. आरडाओरड करत नासधूस केली असे या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे.

दहशत निर्माण करण्यासाठीच असला प्रकार घडल्याचं बोलले जात आहे. अधिक माहिती अशी : कोयता घेऊन आलेल्या गुंडानी टपऱ्या पाडल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन या गरिबांना करावे लागले आहे.

सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या व्हिडिओमध्ये गुंडांनी कोयता हाती घेत त्याच्या साहाय्याने आरडा ओरड करत टपऱ्या पडल्याचे दिसत आहे. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ ऍक्शन घेतली आहे.

कोतवाली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत रात्री पाठलाग करून तिघा गुंडांना ताब्यात घेतलेय. दरम्यान हा धुमाकूळ घातल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने उघडकीस आलाय.

कोयता गॅंगची याआधीही दहशत
याआधी देखील कोयता गॅंग मधील गुंडानी अशीच दहशत करण्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती समजली आहे. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात नगर पुणे महामार्गावरील सुपा गावात असा प्रकार घडला होता व त्यावेळी देखील या गुंडांनी टपऱ्या पाडल्या होत्या.

दरम्यान त्या घटनेत दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना घडली होती. आता पुन्हा कोयता गँगने अशी कृती केल्याने नगरकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe