Bike Care Tips :- पावसाळ्याच्या कालावधीमध्ये आपल्याला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आपण वापरत असलेला स्मार्टफोन तसेच वाहने इत्यादींची काळजी घेणे या कालावधीत खूप गरजेचे असते. कारण स्मार्टफोन सारख्या गॅजेटला जर पाणी लागले किंवा पाण्यात ओला झाला तर तो खराब होण्याची शक्यता असते. अशाप्रसंगी आपल्याला आर्थिक नुकसान सहन करावे लागते.
अगदी याच पद्धतीची गोष्ट ही मोटरसायकल किंवा कार इत्यादी वाहनांच्या बाबतीत देखील आपल्याला दिसून येते. खासकरून मोटरसायकल म्हणजेच बाईकच्या दृष्टिकोनातून बघितले तर पावसामुळे बऱ्याचदा बाईकच्या पेट्रोल टाकीमध्ये पाणी जाते व जेव्हा पेट्रोलमध्ये अशा प्रकारचे पाणी जाते तेव्हा बाईक सुरू व्हायला अनेक प्रकारच्या अडचणी देते किंवा इंजिनच्या संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.
त्यामुळे जर अशा प्रकारची परिस्थिती उद्भवली म्हणजेच बाईकच्या पेट्रोल टाकीत पाणी गेले तर काय करावे किंवा कुठली काळजी घ्यावी हे आपल्याला माहीत असणे देखील गरजेचे आहे. जेणेकरून येणारी समस्या आपल्याला टाळता येईल.
मोटरसायकलच्या पेट्रोल टाकीत पाणी गेल्यास काय कराल?
1) टाकीत पाणी गेल्यास मोटरसायकल सुरू करू नका – समजा तुमच्या बाईकच्या पेट्रोलच्या टाकीमध्ये काही कारणामुळे थेट पाणी गेले तर तुम्ही अशावेळी ती बाईक चालू करण्याचा मुळीच प्रयत्न करू नका. पाणी गेल्यानंतर जर बाईक सुरू केली तर ते आत शिरलेले पाणी इंजिन पर्यंत जाण्याचा धोका वाढतो व इंजिनला धोका होऊ शकतो.
2) टाकी पूर्णपणे रिकामी करावी – पेट्रोलच्या टाकीमध्ये जर पाणी गेले असेल तर ती बाईक सुरु न करता अगोदर टाकीतील पेट्रोल पूर्ण रिकामे करून घ्यावे म्हणजेच टाकी रिकामी करावी. रिकामी केल्यानंतर तिला काही काळ सुकू द्यावी आणि नंतर असं केल्यामुळे बाईकेची पेट्रोल टाकी पूर्णपणे रिकामी होते व कोरडी होते.
3) पाण्यापासून पेट्रोल वेगळे करणे – या प्रकारामध्ये बाटलीमध्ये पाणी आणि पेट्रोलचे मिश्रण काही वेळ ठेवल्यानंतर ते वेगळे होते. अशाप्रसंगी पाणी वरच्या बाजूला राहते आणि पेट्रोल खालच्या भागाला जमा होते. अशावेळी बाटलीतून वर जमा झालेले पाणी व्यवस्थित काढून घ्यावे व नंतर बाटलीमध्ये फक्त पेट्रोल उरते.
4) नंतर इंजिनची तपासणी करणे – वर सांगितलेल्या सर्व गोष्टी केल्यानंतर शेवटी मोटर सायकलचे इंजिन तपासून घेणे गरजेचे आहे. असा केल्यामुळे इंजिन पर्यंत पाणी गेले आहे की नाही हे आपल्याला कळते. इंजिनपर्यंत पाणी गेले असेल तर बाईक लगेच सुरू करण्याच्या नादात पडू नये. सर्विस सर्विस सेंटर मध्ये जाऊन इंजिन पर्यंत पोहोचणारे पाणी काढून टाकावे..