Indian Law : भारतात लोकशाही असून कायद्याचे राज्य आहे. भारतीय कायद्यात सर्वसमावेशक अशा तरतुदी करून देण्यात आलेल्या आहेत. भारतात लागू असणारे कायदे सर्वच लोकांसाठी समान आहेत.
कायद्याच्या चौकटीत राहूनच आपल्या देशाचा कारभार चालतो. मात्र असे असले तरी सर्वसामान्यांना सर्वच कायद्यांची माहिती नसते. यामुळे अनेकदा सर्वसामान्य जनता अडचणीत सापडते.

दरम्यान आज आपण भारतीय कायद्यातील अशाच एका महत्त्वाच्या तरतुदी विषयी जाणून घेणार आहोत. खरंतर अनेकांच्या माध्यमातून जर एखाद्या व्यक्तीला एखादी वस्तू सापडली तर अशा वस्तूवर कोणाचा अधिकार असतो असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
भारतीय कायद्यात यासंदर्भात काय तरतूद आहे याच बाबत आज आपण माहिती पाहणार आहोत. भारतीय कायद्याच्या जाणकारांनी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्याच्या मालकीची एखादी वस्तू आपल्याला सापडली तर ती सापडलेली वस्तू आपल्या मालकीची होऊ शकत नाही.
भारतीय कायद्यानुसार दुसऱ्याच्या मालकीची एखादी वस्तू आपल्याला सापडलेली असली तरी त्या वस्तूवर आपला मालकी हक्क येत नाही. यासंदर्भात भारतीय करार कायद्यात तरतूद करून देण्यात आली आहे.
भारतीय करार कायदा 1872 च्या कलम 71 मध्ये यासंदर्भात तरतूद आहे. या तरतुदीनुसार दुसऱ्याचा माल किंवा वस्तू सापडलेल्या व्यक्तीने ज्याची वस्तू हरवली आहे त्या मालकाचा शोध घेऊन त्याला ती वस्तू परत केली पाहिजे.
वस्तू सापडली आहे म्हणून ती वस्तू लपवून ठेवली नाही पाहिजे. जर समजा काही प्रकरणांमध्ये मालकाचा शोध लागला नाही तर ती वस्तू जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जमा केली पाहिजे.
उदाहरणार्थ एखाद्याची म्हैस तुम्हाला सापडली, पण ती म्हैस तुमच्या शेजारच्याची आहे हे माहीत असूनही तुम्ही ती म्हैस त्या शेजाऱ्याला परत न करता बाजारात नेऊन विकली तर मालमत्तेचा गैरवापर केला म्हणून त्या व्यक्तीला भारतीय न्यायसंहिता 2023 च्या कलम 314 नुसार दोन वर्षाची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात.
यामुळे जर तुम्हाला एखाद्याची वस्तू सापडली तर ती वस्तू नेमकी कोणाची आहे याचा शोध घेऊन त्या व्यक्तीला ती वस्तू देणे आवश्यक आहे. जर समजा तुम्हाला सापडलेली वस्तू नेमकी कोणाची आहे याचा शोध घेता आला नाही तर तुम्ही ती वस्तू तुमच्या जवळील पोलीस स्टेशन मध्ये जमा करणे आवश्यक आहे.
जर तुम्ही सापडलेली वस्तू त्याच्या मूळ मालकाला परत केली नाही किंवा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जमा केली नाही तर अशा प्रकरणात तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. यामुळे सापडलेली वस्तू ही कोणत्याही परिस्थितीत तुमच्या मालकीची होऊ शकत नाही याची नोंद घ्यायची आहे.