Waras Pramanpatr : एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या नावावर असणारी संपत्ती मिळवण्यासाठी त्या व्यक्तीच्या वारसांना वारस प्रमाणपत्र सादर करावे लागते. अनेकांना मात्र हे वारस प्रमाणपत्र कसे काढले जाते, यासाठी कोण कोणते कागदपत्रे लागतात, यासाठी अर्ज कुठे करावा लागतो? या विषयी माहिती नसते.
यामुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. मयत व्यक्तीच्या जाण्याने आधीच कुटुंबावर मोठी शोक काळा पसरलेली असते आणि अशा या दुःखाच्या काळातच त्यांना वारस प्रमाणपत्रासाठी अडचण येते.

पण, आज आपण वारस प्रमाणपत्र कसे काढले जाते याची प्रोसेस नेमकी कशी असते या संदर्भात अगदी डिटेल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
वारस प्रमाणपत्राचा नेमका उपयोग काय होतो
एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीच्या वारसांना वारस प्रमाणपत्र लागते. मात्र हे वारस प्रमाणपत्र नेमके कशासाठी उपयोगी येते. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की मयत व्यक्तीच्या नावावर असणारी संपत्ती, घर, जमीन-जुमला, बँकेतील पैसे इत्यादी मिळवण्यासाठी वारस प्रमाणपत्राची गरज भासत असते.
अर्थातच वारस प्रमाणपत्र एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. कायदेशीर वारसांना सरकारकडून वारस प्रमाणपत्र दिले जाते आणि याच वारस प्रमाणपत्राचा उपयोग करून मयत व्यक्तीच्या नावावर असणारे संपत्ती कायदेशीर वारसांना मिळवता येते.
वारस प्रमाणपत्र कसे काढले जाते?
व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीचे नातेवाईक किंवा कायदेशीर वारस वारस प्रमाणपत्र काढण्यासाठी माननीय न्यायालयात अर्ज करू शकतात.
न्यायालयात वारस प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना मयत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र आणि सर्व कायदेशीर वारसांची नावे अर्जात नमूद करावी लागतात. न्यायालयात अर्ज केल्यानंतर कायदेशीर वारसांना वारस प्रमाणपत्र दिले जाते.