ATM Card Rule : भारतात अलीकडील काही वर्षांमध्ये बँकिंग सेक्टर मध्ये मोठमोठे बदल पाहायला मिळाले आहेत. आता पैशांचे व्यवहार करण्यासाठी नेट बँकिंग आणि यूपीआय सारख्या माध्यमांचा वापर होतोय. ऑनलाईन पेमेंटमुळे आता रोकड व्यवहार कमी होत आहेत. फोन पे, गुगल पे, पेटीएम अशा प्लॅटफॉर्मच्या वापरामुळे अगदी गाव खेड्यात देखील कॅशचा वापर कमी झाल्याचे आढळले आहे.
अहो अलीकडे कमी शिक्षण घेतलेले लोक सुद्धा फोन पे वापरत आहेत. भाजी विकणारे, फेरीवाले साऱ्यांकडेच फोन पे आहे. मात्र, असे असले तरी आजही एटीएम कार्डने मोठ्या प्रमाणात पैसे काढले जातात. अर्थातच कॅश चा वापर सुद्धा होतोच.

दरम्यान आजची ही बातमी एटीएम कार्डचा वापर करणाऱ्यांसाठी खास ठरणार आहे. आज आपण एटीएम कार्ड बाबत आरबीआय चे काही नियम थोडक्यात समजून घेणार आहोत.
मयत व्यक्तीच्या एटीएम कार्ड मधून पैसे काढले जाऊ शकतात का? जर मरण पावलेल्या व्यक्तीच्या एटीएम मधून पैसे काढले तर त्यांच्यावर काही कारवाई होते का? असे काही प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात उठत आहेत. आज आपण याच प्रश्नांची उत्तर जाणून घेणार आहोत.
मयत व्यक्तीच्या एटीएम चा वापर करून पैसे काढणे योग्य की अयोग्य?
एखाद्याच्या कुटुंबात एखाद्याचा मृत्यू झाला की, कुटुंबातील सदस्य त्याच्या एटीएममधून पैसे काढतात. पण, RBI च्या नियमांनुसार असे करणे बेकायदेशीर आहे. जो मयत व्यक्तीचा नॉमिनी असतो त्याला सुद्धा बँकेला न सांगता खात्यातून पैसे काढता येत नाहीत.
जर कोणी असे करताना पकडला गेला तर त्याला शिक्षाही होऊ शकते. तुरुंगात सुद्धा जावे लागू शकते. म्हणून मयत व्यक्तीच्या एटीएम मधून पैसे काढता येत नाहीत. जर असे कोणी केले तर ते बेकायदेशीर ठरते आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
मग मयत व्यक्तीच्या अकाउंट मधून पैसे काढताच येत नाहीत का? तर नाही असे नाहीये. जेव्हा मृत व्यक्तीची सर्व मालमत्ता घरातील एखाद्या व्यक्तीच्या नावावर हस्तांतरित केली जाते तेव्हाच त्या मरण पावलेल्या व्यक्तीच्या अकाउंट मधून पैसे काढता येतात.
यासाठी कुटुंबातील सदस्याने सदर व्यक्तीच्या मृत्यूची माहिती आधी बँकेला देणे गरजेचे आहे. मयत व्यक्तीच्या बँक अकाउंटला नॉमिनी असणाऱ्या लोकांना देखील बँकेला याची माहिती द्यावी लागते.
जर एकापेक्षा जास्त नॉमिनी असतील तर अशा प्रकरणात संमतीपत्र द्यावे लागते. जे व्यक्ती मयत व्यक्तीच्या बँक खात्याला नॉमिनी असतात त्यांना एक फॉर्म भरावा लागतो.
फॉर्मसोबत पासबुक, अकाउंट टीडीआर, चेकबुक, डेथ सर्टिफिकेट आणि तुमचे आधार आणि पॅन कार्डही जोडावे लागते. हा फॉर्म भरल्यानंतर मयत व्यक्तीच्या बँक खात्याचे नॉमिनी सदर व्यक्तीच्या बँक अकाउंट मधून पैसे काढू शकतात.