देशभरातील 1 कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. 8वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होईल की नाही, यावर अनिश्चितता कायम आहे. केंद्र सरकारने आयोगाच्या स्थापनेसाठी मंजुरी दिली असली तरी, त्याच्या अंमलबजावणीबाबत अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तीवेतनधारकांना पगारवाढीच्या प्रतीक्षेत राहावे लागणार आहे.
मंत्रिमंडळाची मंजुरी
16 जानेवारी 2025 रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेस मंजुरी दिली. हा आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी आणि पेन्शनधारकांच्या भत्त्यांचा आढावा घेणार आहे. सरकारच्या माहितीनुसार, या आयोगाच्या शिफारशींमुळे वेतन संरचनेत मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
पगारात किती वाढ
8व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार फिटमेंट फॅक्टर 2.08 वर निश्चित केल्यास, केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 18,000 वरून 37,440 रुपये होऊ शकते. तसेच, पेन्शन देखील 9,000 वरून 18,720 रुपये होऊ शकते.जर फिटमेंट फॅक्टर 2.86 वर जाईल, तर वेतन 186% वाढू शकते. अशा परिस्थितीत, किमान वेतन 51,480 रुपये आणि पेन्शन 25,740 रुपये होऊ शकते. मात्र, यावर सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
7 वा वेतन आयोग
भारत सरकार वेळोवेळी वेतन आयोग स्थापन करते, जो सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्यांच्या संरचनेसंबंधी शिफारशी करतो. पहिला वेतन आयोग 1947 मध्ये स्थापन करण्यात आला होता, त्यानंतर आतापर्यंत सात वेतन आयोग लागू करण्यात आले आहेत. सध्याचा 7वा वेतन आयोग 2016 मध्ये लागू करण्यात आला होता. हा आयोग 2014 मध्ये स्थापन झाला आणि नोव्हेंबर 2015 मध्ये अहवाल सादर केला. त्याच्या अंमलबजावणीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ झाली होती.
8 वा वेतन आयोग
यासंदर्भात अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 8वा वेतन आयोग लागू होण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. 2026 पासून 50 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 65 लाख निवृत्तीवेतनधारकांसाठी वेतन आणि भत्त्यांमध्ये सुधारणा होईल की नाही, याबाबत अजूनही स्पष्टता नाही.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पुढील काय ?
तज्ज्ञांच्या मते, सरकार निवडणुकीपूर्वी मोठे आर्थिक निर्णय घेण्यास सावधगिरी बाळगते, त्यामुळे 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीबाबत अंतिम निर्णय 2025 च्या अखेरीस होऊ शकतो. कर्मचारी आणि पेन्शनधारकांना अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी लागेल.
8वा वेतन आयोगाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली असली तरी, त्याची अंमलबजावणी 1 जानेवारी 2026 पासून होईल की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता असून, सरकार लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा करू शकते. त्यामुळे, केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी आगामी अपडेट्सकडे लक्ष ठेवावे.