विषबाधा प्रकरणी ‘त्या’ दुकानदाराचा परवाना झाला रद्द

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपूर्वी उपवासाची भगर खाल्याने यामधून अनेकांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात घडल्याचा उघडकीस आला होता.

या घटनेची प्रशासनाने तात्काळ दाखल घेतली आहे. या घटनेची दखल घेत अहमदनगर येथील अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी, म्हैसगाव, तांभेरे येथे विविध किराणा दुकानांत छापा टाकून भगरपीठाचा साठा जप्त केला.

तसेच जनतेचे आरोग्य धोक्यात आणल्याने वरील तिन्ही गावांतील किराणा दुकानदारांचे परवाने पुढील आदेश येईपर्यंत निलंबित करण्यात आले असून त्यांनी वितरित केलेले भगरपीठ ज्या ग्राहक व व्यावसायिकांना वितरित केले आहे, त्यांच्याकडून ते पुन्हा परत घेऊन त्याचा अहवाल पाठविण्याचे आदेश संबंधित अधिकार्‍यांनी दिले आहेत.

‘अक्षय ट्रेडर्स’ चा परवाना निलंबित भगर पीठातून विषबाधा प्रकरणी राहुरी फॅक्टरी येथील ठोक किराणा विक्रेता ‘अक्षय ट्रेडर्स’ चा परवाना निलंबित केला. त्यांनी विक्री केलेले 1400 किलो भगरपीठ परत बोलविण्यास सांगितले. या तीन दुकानांवर धाड टाकत जप्त केला

उर्वरित साठा मौजे म्हैसगाव येथील बाळासाहेब बाबुराव गागरे यांच्या मातोश्री सुपर मार्केट येथे भेट देऊन तपासणी केली व भगर पीठाचा नमुना घेऊन उर्वरित साठा 29 किलो जप्त केला. बापूसाहेब रामभाऊ जाधव यांच्या सचिन किराणा स्टोअर्स येथे भेट देऊन तपासणी केली व भगर पीठचा नमुना घेऊन उर्वरित 6 किलो साठा जप्त केला.

तांभेरे येथे रवींद्र उत्तम मुसमाडे यांच्या श्रीराम किराणा व जनरल स्टोअर्स या आस्थापनेची तपासणी केली असता याठिकाणी भगर पीठाचा साठा आढळून आला नाही. वरील तिन्ही दुकानदारांना त्यांनी ग्राहकांना विक्री केलेले व उपलब्ध असलेले भगर पीठ रिकॉल करण्याबाबत आदेश दिले आहेत.

वरील तिन्ही व्यापार्‍यांनी राहुरी फॅक्टरी येथील अक्षय ट्रेडर्स यांच्याकडून भगर पीठ खरेदी केले होते. ही कार्यवाही अन्न सुरक्षा अधिकारी प्र.बा.कुटे यांनी सहायक आयुक्त ( अन्न ) सं.पां.शिंदे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment