श्रीगोंद्याच्या यात्रेत दुर्दैवी घटना! खेळणी विकणाऱ्या १७ वर्षीय मुलीचा मृत्यू

Published on -

श्रीगोंदा येथील संत शेख महंमद महाराज यात्रेत फुले, तोरण आणि खेळणी विकणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. खुशी अनिल भोसले असे या मुलीचे नाव असून,

ती मूर्तिजापूर तालुक्यातील सिलगुंडी गावची रहिवासी होती. यात्रेच्या शेवटच्या दिवशी उन्हाच्या तीव्रतेमुळे अचानक चक्कर येऊन पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

खुशीच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे डॉक्टरांनी उत्तरिय तपासणी अहवालात नमूद केले आहे. यात्रा संपल्यानंतर मोठमोठे पाळणे उचलण्याचे काम सुरू असताना तिला त्रास जाणवू लागला आणि काही वेळातच तिने प्राण सोडले.

खुशीची आई दोन वर्षांपूर्वीच निधन पावली होती, त्यामुळे ती मामासोबत राहत होती. उदरनिर्वाहासाठी तिने यात्रेत खेळणी, फुगे आणि तोरण विकण्याचे काम केले. सोमवारी सकाळी ९ वाजता जेवण करून ती कामावर गेली. मात्र, दुपारी १२.४० वाजता तिला अचानक त्रास होऊ लागला आणि काही क्षणांतच ती कोसळली.

संत शेख महंमद महाराज यात्रेच्या निमित्ताने ती श्रीगोंद्यात आली होती. यात्रेच्या गजबजाटात तिचे छोटेसे दुकान होते, जिथे ती खेळणी विकत होती. मात्र, उन्हाच्या तीव्रतेमुळे तिच्या जीवावर बेतले. तिच्या अचानक जाण्याने संपूर्ण यात्रेमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe