अहिल्यानगरमध्ये रस्त्यावर प्रवाशांना लुटण्याच्या अनेक घटना अलीकडील काळात घडल्या आहेत.नगर-पुणे महामार्गावर चास शिवारात लुटीची घटना ताजी असतानाच आता आणखी एक लुटीचा थरार समोर आला आहे. कार मधील कुटुंबाला कोयत्याने मारहाण करत कार मधील महिलांच्या गळ्यातील सुमारे ८ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लुटून नेण्याची घटना घडली आहे. हा थरार नगर-पुणे महामार्गावर चास (ता.नगर) शिवारात बंद पडलेल्या पेट्रोल पंपासमोर घडलाय. २५ नार्चला पहाटे ३.३० च्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत भाऊसाहेब मोघाजी भोजने (व्य ५५, रा. जामखेड, ता. अंबड, जि. जालना, हल्ली रा. बागेर, पुणे) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे जालना जिल्ह्यातील रहिवासी असून कामानिमित्त बाणेर, पुणे येथे वास्तव्यास आहेत. ते त्यांच्या मुळगावी गेले होते. तेथून २५ मार्चला पहाटे नगरमार्गे पुण्याकडे मारुती वेंगनआर कारने कुटुंबासह जात होते.

फिर्यादी, त्यांची पत्नी, मुलगी, २ लहान मुले व चालक असे होते. नगरच्या पुढे चास शिवारात पहाटे ३.३० च्या सुमारास गेल्यावर फिर्यादी भोजने यांनी चालकाला कर रस्त्याच्या कडेला उभी करायला सांगितली व ते लघुशंकेसाठी कारमधून खाली उतरले. त्यावेळी रस्त्याच्या बाजूला अंधारातून अचानक दोघे जण आले, त्यांच्या हातात कोयते होते. त्यांना पाहून कार चालक कार चालू करायला लागला असता, त्या दोघांपैकी एकाने चालकाच्या डोळ्यात गिरची पूड टाकून कोयत्याच्या गुठीने त्याला नारले. त्या हल्ल्याने तो खाली कोसळला.
तेवढ्यात दुसन्या चोरट्याने फिर्यादी यांना कारच्या दरवाजात जखडून ठेवत त्यांना कोयत्याच्या मुठीने मारहाण केली. कारमधील महिलांना कोयत्याचा धाक दाखवत सर्व दागिने काढून देण्यास सांगितले, भीतीपोटी महिलांनी दागिने काढून चोरट्यांच्या हवाली केले. ते सुमारे ८ तोळे वजनाचे दागिने घेवून दोघे चोरटे रस्त्याच्या बाजूला अंधारात पसार झाले.
त्यानंतर घाबरलेल्या फियांदी भोजने यांनी डायल ११२ वर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. सदर माहिती मिळताच नगर तालुका पोलिस ठाण्याचे रात्र गस्त घालणारे पथक घटनास्थळी दाखल झाले. काही वेळातच नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक संपतराव भेसले. स.पो. नि. प्रल्हाद गिते यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी भेट दिली. याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांनी २ अज्ञात लुटारुंच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.