Property Rights : भारतात मुलांना आणि मुलींना वडिलांच्या संपत्तीत समान अधिकार देण्यात आले आहेत. मात्र काही प्रकरणांमध्ये मुलीला आपल्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार मिळत नाही. भारतीय कायद्याने अविवाहित महिलेला आपल्या वडिलांच्या संपत्तीत जेवढा अधिकार देण्यात आला आहे तेवढाच अधिकार विवाहित महिलेला सुद्धा मिळतो.
बहिणीला आपल्या भावाप्रमाणेच वडिलांच्या संपत्ती समान अधिकार देण्याची मोठी तरतूद भारतीय कायद्यात करून देण्यात आली आहे. महिला सक्षमीकरणासाठी हा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयामुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्या आहेत.

मात्र असे असले तरी अनेकांना भारतीय संपत्ती विषयक कायद्यांची फारशी माहिती नसते. यामुळे कुटुंबामध्ये मोठ्या प्रमाणात संपत्तीवरून वाद-विवाद पाहायला मिळतात. त्यातील काही वादविवादाची प्रकरणे न्यायालयात पोहोचतात आणि मग न्यायालयाच्या माध्यमातूनच संपत्तीच्या प्रकरणांचा निकाल लागत असतो.
दरम्यान आज आपण भारतीय कायद्यातील संपत्ती विषयक अशा एका बाबीची माहिती जाणून घेणार आहोत ज्याबाबत जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. कोणत्या प्रकरणांमध्ये मुलींना आपल्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार मिळत नाही याबाबत आज आपण माहिती पाहणार आहोत.
कायदा काय सांगतो?
2005 मध्ये हिंदू तर अधिकारी कायदा 1956 मध्ये सुधारणा करण्यात आली. या सुधारणेनंतर मुलींना वडिलोपार्जित संपत्तीत मुलांइतकाच समान अधिकार देण्यात आला. या सुधारणेनंतर अविवाहित तसेच विवाहित महिलांना आपल्या वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीत समान अधिकार मिळाला.
मुलींना भारतीय कायद्याने वडिलोपार्जित मालमत्तेत हक्क मिळत असला, तरी जर मालमत्ता वडिलांनी स्वतःच्या उत्पन्नातून मिळवलेली असेल, म्हणजेच वडिलांची मालमत्ता स्वअर्जित असेल तर परिस्थिती वेगळी असते.
वडिलांनी कमावलेली किंवा विकत घेतलेली मालमत्ता त्यांच्या इच्छेनुसार कोणालाही देणे हा त्यांचा कायदेशीर अधिकार आहे. त्यामुळे जर वडिलांनी त्यांच्या स्वअर्जित मालमत्तेपासून मुलीला वगळले असेल, तर तिला त्यावर दावा करता येणार नाही.
तसेच, जर संपत्ती वडिलांनी उपहार स्वरूपात दुसऱ्याला दिली असेल अशा संपत्तीमध्ये मुलीला अधिकार मिळत नाही. जर संपत्तीवर कायद्याच्या अटीखाली जप्ती किंवा गुन्ह्याच्या चौकशीचा परिणाम असेल तर अशा संपत्तीमधून देखील मुलींना वगळले जाऊ शकते.
वडिलांनी जिवंतपणी संपत्तीचे हस्तांतर इतर नातेवाईकांना, संस्थेला किंवा बँकेला केले असेल तर अशा प्रकरणांमध्ये देखील मुलींना अधिकार मिळत नाही.
शिवाय जर वडील जिवंत असतील, तर त्यांना त्यांच्या संपत्तीचा वारसा ठरवण्याचा पूर्ण अधिकार असतो, म्हणून अशा प्रकरणांमध्ये देखील मुलींना आपल्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार मिळणे अशक्य होऊ शकत.