Shukra transit 2025 | शुक्र ग्रह वैदिक ज्योतिषशास्त्रात सौंदर्य, संपत्ती, प्रेम, वैवाहिक सुख आणि भौतिक सुखसुविधांचा कारक मानला जातो. हा ग्रह 25 एप्रिलपर्यंत गुरु ग्रहाच्या नक्षत्रात म्हणजेच पूर्वा भाद्रपद नक्षत्रात भ्रमण करणार आहे. या विशेष गोचराचा सर्व 12 राशींवर परिणाम होणार आहे.
मात्र, यातही 4 राशी अशा आहेत, ज्यांना याचा विशेष लाभ मिळेल. या काळात शुक्र देवगुरु बृहस्पतीच्या नक्षत्रात असल्यामुळे गुरूचे आध्यात्मिक प्रभाव शुक्रच्या भौतिक कारकत्वास पूरक ठरतील, ज्यामुळे काही राशींना प्रगती, समृद्धी आणि यशाचा विशेष लाभ मिळू शकतो.

कन्या राशी-
कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या लोकांना आर्थिक बाजू बळकट करण्याची संधी मिळेल. जुनी प्रलंबित कामे मार्गी लागतील. व्यावसायिक कामात प्रगती होईल, चांगले उत्पन्न मिळेल आणि कोर्ट प्रकरणांमध्ये देखील यश मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय पदोन्नतीचे योगदेखील आहेत.
मीन राशी-
मीन राशीच्या व्यक्तींसाठीही शुक्राचे हे गोचर फलदायी ठरेल. नवी कामे आणि योजना यशस्वी ठरतील. नोकरीत पदोन्नती आणि पगारवाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक अडचणी दूर होतील आणि घरगुती वातावरण समाधानकारक राहील. मानसिक तणाव कमी होईल आणि धार्मिक कार्यांमध्ये रस वाढेल.
कुंभ राशी-
कुंभ राशीच्या जातकांसाठीही ही वेळ अत्यंत शुभ ठरणार आहे. विशेषतः नोकरी किंवा व्यवसायात संधी मिळतील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना योग्य संधी प्राप्त होईल. उत्पन्न वाढेल आणि प्रेमसंबंधांमध्ये स्थैर्य येईल. लग्नासाठी इच्छुक लोकांना अनुकूल प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.
मकर राशी-
मकर राशीसाठीही हा काळ फायद्याचा ठरणार आहे. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील, व्यवसायात वाढ होईल. विशेषतः डिझाईनिंग, कला, क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी यशाचे दरवाजे उघडतील. उत्पन्न वाढेल आणि नोकरीत पदोन्नतीची शक्यता प्रबळ आहे.
हा संपूर्ण काळ या चार राशींकरिता अत्यंत शुभ असून त्यांच्या जीवनातील अनेक अडचणी सुटून प्रगतीचा मार्ग मोकळा होऊ शकतो.