Mahayuti Report Card : महायुती सरकारच्या १०० दिवसांत कोण काय केलं ? महायुतीच्या कामगिरीत आश्चर्यकारक निकाल !

या मूल्यमापनात वेबसाइट सुधारणा, कार्यालयीन सुविधा, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीला चालना आणि तंत्रज्ञानाचा वापर यासारख्या १० प्रमुख मुद्द्यांचा विचार करण्यात आला. यामध्ये ५ मंत्रालयीन सचिव, ५ आयुक्त, ५ जिल्हाधिकारी, ५ पोलीस अधीक्षक, ५ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, ४ महापालिका आयुक्त, ३ पोलीस आयुक्त, २ विभागीय आयुक्त आणि २ पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

Published on -

महायुती सरकारने सत्तेत आल्यानंतर पहिल्या १०० दिवसांच्या कामगिरीचा अहवाल नुकताच जाहीर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती शेअर केली असून, यामध्ये विविध विभाग आणि अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले आहे. कोणत्या विभागाने किती गुण मिळवले आणि कोणत्या अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली, याची सविस्तर यादी जाहीर झाली आहे.

१०० दिवसांचा कृती आराखडा

महायुती सरकारने सत्तेत येताच प्रत्येक विभागासाठी १०० दिवसांचा एक विशेष कृती आराखडा तयार केला होता. या योजनेअंतर्गत विकासकामे, प्रकल्प आणि जनहिताच्या योजना राबवण्यावर भर देण्यात आला. सर्व विभागांना १ मे पर्यंत नियोजित कामे पूर्ण करण्याचे आणि त्याची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले होते. यामुळे प्रशासकीय यंत्रणेला चांगलीच कसरत करावी लागली.

कामगिरीचे मूल्यमापन

भारतीय गुणवत्ता परिषदेने (Quality Council of India) सरकारच्या या १०० दिवसांच्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन केले आहे. यामध्ये प्रत्येक विभागाने किती टक्के उद्दिष्टे पूर्ण केली, कोणत्या विभागाने आघाडी घेतली आणि कोणत्या अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट काम केले, याची आकडेवारी समोर आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सांगितले की, “उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे जाहीर करताना मला खूप आनंद होत आहे. या अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या टीमने प्रशासनाला अधिक कार्यक्षम आणि लोकाभिमुख बनवले आहे. मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि भविष्यातही असेच उत्तम कार्य करण्यासाठी शुभेच्छा देतो.”

उत्कृष्ट विभाग आणि त्यांचे गुण

खालील विभागांनी सर्वाधिक गुण मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली आहे:

  • महिला व बाल विकास विभाग: ८०%

  • सार्वजनिक बांधकाम विभाग: ७७.९५%

  • कृषी विभाग: ६६.१५%

  • ग्रामविकास विभाग: ६३.८५%

  • परिवहन आणि बंदरे विभाग: ६१.२८%

उत्कृष्ट जिल्हाधिकारी

  • चंद्रपूर: ८४.२९

  • कोल्हापूर: ८१.१४

  • जळगाव: ८०.८६

  • अकोला: ७८.८६

  • नांदेड: ६६.८६

उत्कृष्ट आयुक्त आणि संचालक

  • संचालक, तंत्र शिक्षण: ७७.४३

  • आयुक्त, जमावबंदी: ७२.८६

  • आयुक्त, आदिवासी विकास: ७२.५७

  • मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण जीवनोन्नती अभियान: ७०.१८

  • आयुक्त, वैद्यकीय शिक्षण: ६९.४३

उत्कृष्ट पोलीस अधीक्षक

  • पालघर: ९०.२९

  • गडचिरोली: ८०.००

  • नागपूर (ग्रामीण): ८०.००

  • जळगाव: ६५.७१

  • सोलापूर (ग्रामीण): ६४.००

उत्कृष्ट जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी

  • पुणे: ९२.००

  • नागपूर: ७९.४३

  • नाशिक: ७५.४३

  • वाशिम: ७२.००

उत्कृष्ट पोलीस आयुक्त

  • मीरा-भाईंदर: ८४.५७

  • ठाणे: ७६.५७

  • मुंबई, रेल्वे: ७३.१४

उत्कृष्ट महापालिका आयुक्त

  • उल्हासनगर: ८६.२९

  • पिंपरी चिंचवड: ८५.७१

  • पनवेल: ७९.४३

  • नवी मुंबई: ७९.४३

उत्कृष्ट विभागीय आयुक्त

  • कोकण: ७५.४३

  • नाशिक: ६२.२९

  • नागपूर: ६२.२९

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe