Income Tax Rule : तुमचेही बँक अकाउंट असेल नाही का ? मग आजची ही बातमी तुमच्याच कामाच्या आहे. आपण सर्वजण आपल्या बँकेच्या अकाउंट मध्ये मग ते सेविंग असो किंवा करंट असो त्यामध्ये पैसे जमा करत असतो आणि जेव्हा आपल्याला पैशांची गरज पडते तेव्हा आपण त्यातून पैसे काढतो.
सेविंग अकाउंट मध्ये जमा असणाऱ्या पैशांवर बँकेकडून व्याज सुद्धा दिले जाते यामुळे सेविंग अकाउंट मध्ये पैसे जमा करणे ग्राहकांसाठी फायद्याचे ठरते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण आपल्या बँक अकाउंट मध्ये किती पैसे जमा करू शकतो.

म्हणजे बँक अकाउंट मध्ये जास्तीत जास्त किती पैसे जमा करता येतात, याबाबतचे नियम काय आहेत? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का. नाही ना मग आज आपण याच संदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आयकर कायदा 2025 नुसार, बचत खात्यात रोख रक्कम जमा करण्यासाठी एक निश्चित मर्यादा ठरवून देण्यात आली आहे.
रोख व्यवहारांवर लक्ष
या अंतर्गत ठराविक कालावधीमध्ये बँक खातेधारक किती रक्कम जमा करू शकतो याची मर्यादा ठरवण्यात आली आहे. आयकर कायद्याच्या या तरतुदींचा महत्त्वाचा उद्देश रोख व्यवहारांवर लक्ष ठेवून मनी लाँड्रिंग, करचोरी आणि बेकायदेशीर कारवाया रोखणे हाच आहे.
दरम्यान आयकर कायद्याच्या या नव्या नियमानुसार, जर समजा एखाद्या व्यक्तीने एका आर्थिक वर्षात आपल्या सेविंग अकाउंट मध्ये म्हणजेच बचत खात्यात 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रोख रक्कम जमा केली तर त्याला आयकर विभागाला माहिती देणे आवश्यक आहे.
तसेच करंट अकाउंट साठी म्हणजेच चालू खात्यासाठी ही मर्यादा 50 लाख रुपये इतकी आहे. जेव्हा एखाद्या ग्राहकाच्या सेविंग बँक अकाउंट मध्ये दहा लाख रुपये किंवा त्याहून अधिक रोख रक्कम जमा होते आणि करंट अकाउंट मध्ये 50 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम जमा होते त्यावेळी बँका तसेच वित्तीय संस्था याची माहिती आयकर विभागाला देतात.
यावर लगेचच आयकर विभागाकडून कर लावला जात नाही मात्र अशा अकाउंट कडे आयकर विभागाची नजर असते. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही बचत खात्यात 10 लाख रुपयांपेक्षा जास्त किंवा चालू खात्यात 50 लाख रुपये जमा केले तर आयकर विभागाला कळवणे बंधनकारक आहे.
दंड किंवा अतिरिक्त कर
ही ठेव थेट करपात्र नाही, परंतु जर स्रोत स्पष्ट नसेल तर त्याची चौकशी केली जाऊ शकते. नियमाचे उल्लंघन केल्यास दंड किंवा अतिरिक्त कर लागू शकतो असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. दुसरीकडे खात्यातून पैसे काढताना सुद्धा टीडीएस भरावा लागू शकतो.
याबाबतची अधिक माहिती अशी की आयकर काय त्यानुसार जर तीन वर्षापासून आयकर रिटर्न भरलेले नसेल त्यांना 20 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढल्यास 2 टक्के आणि 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढल्यास 5 टक्के इतका टीडीएस द्यावा लागतो.
2 टक्के टीडीएस
तसेच जे व्यक्ती आयकर भरतात त्यांना एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढल्यास 2 टक्के इतका टीडीएस भरावा लागतो. म्हणजेच एक कोटी रुपयांपर्यंतची रक्कम काढल्यास यांना कोणताच टीडीएस भरावा लागत नाही.