Chondi Cabinet Meeting : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त पहिल्यादांच महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक चौंडी येथे होत आहे. त्यासाठी दीड एकरांवर मंडप उभारणी केली जात आहे. पाच हेलिपॅड उभारण्यात आले असून, गावातील सर्व रस्ते दुरूस्त केले जात आहेत.
मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, ३६ मंत्री, सहा राज्यमंत्री, विविध विभागाचे सचिव, तसेच प्रशासकीय अधिकारी, पोलिस बंदोबस्त, राज्यातून येणारे आमदार, नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा जवळपास दोन ते तीन हजार लोकांच्या जेवणाचे नियोजन करण्यात आले आहे.

चौंडी येथे येत्या मंगळवारी (६ मे) मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह चौंडीत संपूर्ण मंत्रिमंडळ येणार असून, त्यासाठीची जय्यत तयारी सध्या प्रशासनातर्फे सुरू आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या वतीने सर्व मंत्र्यांना भोजन दिले जाणार आहे.
पुरणपोळी, शिपी आमटी, भाकरीची मेजवानी
सभापती प्रा. शिंदे यांच्यातर्फे दिल्या जाणाऱ्या जेवणात पुरणपोळी, शिपी आमटी, मासवडी, शेंगोळे, पुलाव, कुरडई, थालीपीठ, खवा पोळी, मासवडी, कोथिंबीर वडी, हुरडा थालीपीठ, वांग्याचे भरीत, डाळ बट्टी, मटकी,
मसाला वांगे, स्पेशल शिंगोरी आमटी, भात, बाजरी भाकरी, दही-धपाटे, आमरस चपाती, वांगी भरीत, भाकरी, अळू वडी, मूग भजी, शेवगा भाजी, ठेचा, भाकरी थाळी, म्हैसूर बौंडा, मांडे आदी खाद्यपदार्थ आहे.