अर्जुन ते कुंती…बीआर चोप्रांच्या ‘महाभारत’ मालिकेत ‘या’ मुस्लिम कलाकारांनी साकारल्या होत्या महत्वाच्या भूमिका; तुम्हाला माहीतेय का त्यांची नावं?

Published on -

बी.आर. चोप्रा यांची महाभारत ही दूरदर्शनवरील सर्वाधिक गाजलेली आणि ऐतिहासिक महत्त्वाची मालिका होती. ही मालिका केवळ हिंदू प्रेक्षकांपुरती मर्यादित राहिली नाही, तर विविध धर्मीय लोकांनीही ती तितक्याच श्रद्धेने आणि प्रेमाने पाहिली. अनेक पात्रे, संवाद आणि प्रसंग आजही लोकांच्या स्मरणात आहेत. मात्र तुम्हाला माहिती आहे का, या पौराणिक मालिकेत काही महत्त्वाची पात्रं साकारणारे कलाकार मुस्लिम होते?

बी.आर. चोप्रांनी महाभारतचा आरंभ 2 ऑक्टोबर 1988 रोजी केला आणि ही मालिका 1990 पर्यंत प्रसारित होत होती. या मालिकेचे सेट्स, वेशभूषा, संवाद आणि अभिनय हे सगळं भव्यतेचे उत्तम उदाहरण होते. लाखो प्रेक्षक रविवार सकाळी टीव्हीसमोर बसून महाभारत पाहायचे.

अर्जुन – फिरोज खान

या मालिकेत सर्वात प्रसिद्ध पात्रांपैकी एक म्हणजे अर्जुन. ही भूमिका फिरोज खान यांनी साकारली होती. अभिनयाच्या ताकदीवर त्यांनी हे पात्र अजरामर केलं. इतकंच नव्हे, तर नंतर फिरोज खान यांनी स्वतःचं नावही बदलून अर्जुन ठेवले. त्यांच्या आईने देखील त्यांना अर्जुन या नावाने हाक मारायला सुरुवात केली होती.

कुंती – नाजनीन

पांडवांची आई कुंती ही एक अत्यंत महत्त्वाची भूमिका होती. ही भूमिका नाजनीन नावाच्या मुस्लिम अभिनेत्रीने साकारली होती. त्यांच्या अभिनयातले गांभीर्य आणि मातृत्वाचा भाव प्रेक्षकांच्या मनात आजही कोरलेला आहे.

घटोत्कच – रज्जाक खान

या मालिकेतील एक हटके आणि लक्षवेधी पात्र म्हणजे भीमाचा पुत्र घटोत्कच. ही भूमिका विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या रज्जाक खान यांनी साकारली होती. या पात्रामुळे त्यांनी पौराणिक मालिकेतही आपली छाप पाडली.

राजा परीक्षित – अयुब खान

महाभारताच्या शेवटी दाखवले गेलेले पात्र राजा परीक्षित हे देखील मुस्लिम अभिनेता अयुब खान यांनी साकारले होते. त्यांनी आपल्या मोजक्या पण परिणामकारक अभिनयाने या पात्राला न्याय दिला.

कास्टिंगसाठी झाले 5,000 ऑडिशन्स

या मालिकेतील पात्रांची निवड अतिशय विचारपूर्वक केली गेली. शोचे कास्टिंग डायरेक्टर गूफी पेंटल (शकुनी मामा) यांनी स्वतः सांगितले होते की महाभारतासाठी सुमारे 5,000 लोकांचे ऑडिशन्स घेण्यात आले होते. पात्रांचे चेहरे, आवाज, व्यक्तिमत्त्व आणि संवाद हे सगळं तपासून मगच निवड झाली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News