अवघ्या 15 हजारांच्या आत मिळतील Realme चे 3 दमदार वॉटरप्रूफ फोन! 6000 mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरासह मिळणार बरंच काही

Published on -

पावसाळा सुरू झाला की, सर्वांनाच आपल्या फोनबद्दल विशेष काळजी वाटायला लागते. कारण, मोबाईलमध्ये पाणी शिरलं तर नुकसान केवळ आर्थिकच नाही, तर साठवलेल्या आठवणी, फोटो, कामाची माहिती सगळं काही गमावण्याचा धोका असतो. त्यामुळे जर तुम्ही सध्या नवीन फोन खरेदीचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी या लेखात बेस्ट वॉटरप्रूफ स्मार्टफोन पर्याय देण्यात आले आहेत.

Realme या लोकप्रिय कंपनीने 2025 च्या पावसाळ्यासाठी जबरदस्त तयारी केली आहे. त्यांनी बाजारात असे तीन स्मार्टफोन सादर केले आहेत, जे केवळ IP69 वॉटरप्रूफ रेटिंगसह येत नाहीत, तर त्यांच्या किंमती देखील सामान्य खिशाला परवडतील अशा आहेत, म्हणजेच ₹15,000 पेक्षा कमी. या फोनमध्ये दमदार बॅटरी, उत्तम कॅमेरा आणि भन्नाट प्रोसेसर देण्यात आले आहेत, त्यामुळे पावसाळा असो वा उन्हाळा, हा फोन तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत साथ देणार आहे.

Realme Narzo 80x 5G

Realme Narzo 80x 5G हा या यादीतील एक असा फोन आहे जो केवळ मजबूत आहे असं नाही, तर त्याचा परफॉर्मन्सही वाखाणण्याजोगा आहे. ₹12,998 या किमतीत 6GB RAM आणि 128GB स्टोरेज मिळतंय आणि सगळ्यात विशेष म्हणजे IP69 टॉप वॉटर प्रोटेक्शन त्याला मिळालं आहे. यामध्ये Dimensity 6400 हा प्रोसेसर दिला गेलाय, जो गेमिंगपासून मल्टीटास्किंगपर्यंत सगळं सहज पार पाडतो. 6,000mAh ची मोठी बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंगमुळे तुमचा फोन कधीच थकलेला वाटणार नाही. 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि 120Hz चा स्मूथ डिस्प्ले यामुळे हा फोन परफॉर्मन्स आणि स्टाईल दोन्ही जपतो.

Realme 14x 5G

याच मालिकेतील Realme 14x 5G हा थोडासा महाग, पण तितकाच दमदार पर्याय आहे. ₹14,999 मध्ये मिळणारा हा फोन त्याच्या ArmorShell डिझाइन आणि IP69 स्प्लॅश प्रोटेक्शनमुळे पावसाळ्यातसुद्धा निर्धास्त वापरता येतो. यामध्येही 6GB RAM आणि 128GB स्टोरेज आहे, आणि Dimensity 6300 प्रोसेसरसह येतो. 6.67 इंचाचा डिस्प्ले, 6,000mAh ची बॅटरी आणि 50MP चा मुख्य कॅमेरा यामुळे हा फोन सतत कामात आणि ट्रेंडमध्ये राहणाऱ्या वापरकर्त्यांसाठी खास आहे.

Realme P3x 5G

तिसरा पर्याय आहे Realme P3x 5G, जो ₹13,417 मध्ये Amazon वर उपलब्ध आहे. हा फोन देखील IP69 डस्ट आणि वॉटर रेझिस्टंट रेटिंगसह येतो, म्हणजेच माती, पावसाच्या थेंबांपासून तो सुरक्षित राहतो. यात Dimensity 6400 प्रोसेसर, 6GB RAM, 128GB स्टोरेज, 50MP कॅमेरा आणि 6,000mAh ची दमदार बॅटरी मिळते. 120Hz च्या डिस्प्ले मुळे त्याचा अनुभव अगदी फ्लुइड वाटतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!