Indian Soldier Payment : आपल्यापैकी अनेकांचे भारतीय सैन्यात नोकरी करण्याचे स्वप्न असेल. देशसेवेची इच्छा उराशी बाळगून अनेकजण सैन्य भरतीसाठी तयारी करत असतील. खरेतर गावागावांमध्ये सैन्य भरतीची तयारी करणारे उमेदवार नजरेस पडतात. मैदानी चाचणीसाठी खेड्यापाड्यातील तरुण-तरुणी कठोर मेहनत करतात. दरम्यान जर तुम्हीही सैन्य भरतीची तयारी करत असाल तर आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. जसं की आपणास माहितचं आहे की केंद्रातील सरकारने अलीकडेच सैन्य भरतीचे स्वरूप बदलले आहे.
आता सरकारने अग्नीवीर योजना सुरू केली आहे. या अग्नीवीर योजनेतून भारतीय सैन्यात रुजू होणाऱ्या जवानांना फक्त चार वर्ष नोकरीची संधी दिली जात आहे. पण तरीही शासनाच्या या योजनेला नवयुवकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय आणि आत्तापर्यंत अनेकजण भारतीय सैन्यात अग्नीवीर झाले आहेत. किमान 17.5 वर्ष वय असणाऱ्या उमेदवारांना अग्निवीर भरतीसाठी अर्ज करता येतो. अग्निवीर भरतीसाठी कमाल वय 21 वर्षे इतके आहे. खरंतर तरुणांना अग्निवीर भरतीची मैदानी चाचणी कशी होते, यासाठीची पात्रता काय, लेखी परीक्षा कशी होते या सर्व गोष्टींची माहिती असते. मात्र नोकरीवर लागल्यानंतर पगार किती मिळणार, पगारात किती वजावट होते याची कल्पना नसते.

दरम्यान जर तुम्हालाही भारतीय सैन्यात अग्नीवीर व्हायचे असेल आणि अग्निवीरांना किती पगार मिळतो याबाबत जाणून घ्यायचं असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. आज आपण इंडियन आर्मीमध्ये अग्निवीर पदावर कार्यरत जवानांसाठी सॅलरी स्ट्रक्चर कसे आहे ? याची माहिती पाहुयात.
अग्निवीरांना किती पगार मिळतो ?
इंडियन आर्मी मध्ये अग्निवीर म्हणून रुजू झाल्यानंतर पहिल्या वर्षी जवानांना तीस हजार रुपये प्रति महिना सॅलरी दिली जाते. मात्र यातील 9000 रुपये कट होतात आणि जवानांना 21 हजार रुपये इन हॅन्ड सॅलरी मिळते.
दुसऱ्या वर्षी अग्निवीरांना 33 हजार रुपये प्रति महिना सॅलरी दिले जाते. यात 23 हजार 100 रुपये प्रति महिना याप्रमाणे जवानांना इनहँड सॅलरी मिळते.
नोकरीच्या तिसऱ्या वर्षात अग्निवीर पदावर कार्यरत जवानांना 36 हजार पाचशे रुपये प्रति महिना सॅलरी दिली जाते. प्रत्यक्षात जवानांना 25 हजार पाचशे रुपये इनहँड सॅलरी मिळते.
नोकरीच्या चौथ्या वर्षात अग्नीवीर जवानांचा पगार 40 हजार रुपये प्रति महिना सॅलरी दिली जाते. यातून बारा हजार रुपये कट होतात आणि जवानांना 28 हजार रुपये महिना इन हॅन्ड सॅलरी मिळते.