Pm Kisan Yojana : देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अधिक खास राहणार आहे. कारण की या योजनेच्या लाभार्थ्यांना लवकरच एक मोठी भेट मिळणार आहे.
खरे तर जानेवारी महिना आता अंतिम टप्प्यात आला आहे. दरम्यान जानेवारी महिना संपल्यानंतर लगेचच पीएम किसान च्या शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा होऊ शकतो. 22 वा हफ्त्याची तारीख येत्या काही दिवसांनी जाहीर होण्याची शक्यता आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) अंतर्गत मिळणाऱ्या 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा आता अंतिम टप्प्यात असल्याचे संकेत मिळत आहेत.
देशभरातील कोट्यवधी शेतकरी या योजनेचा लाभ घेत असून, अल्पभूधारक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांसाठी ही योजना मोठा आधार ठरत आहे.
केंद्र सरकारकडून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन समान हप्त्यांत जमा केली जाते.
सध्या शेतकरी 22 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मागील हप्त्यांचा कालावधी पाहता, साधारणपणे दर चार महिन्यांनी एक हप्ता दिला जातो. यानुसार पुढील चार महिन्यांचा कालावधी फेब्रुवारी महिन्यात पूर्ण होत असल्याने, 22 वा हप्ता फेब्रुवारीत जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मात्र, केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, केवळ प्रतीक्षा करून चालणार नाही, तर काही महत्त्वाच्या प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा अनेक शेतकऱ्यांचा हप्ता अडकण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ई-केवायसी (e-KYC).
अनेक वेळा ई-केवायसी अपूर्ण असल्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे थांबवले जातात. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याने आपली ई-केवायसी पूर्ण आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी.
याशिवाय भू-सत्यापन (Land Verification) ही प्रक्रिया देखील तितकीच महत्त्वाची आहे. काही राज्यांमध्ये ही प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. यामुळे लाभार्थी खरोखर पात्र शेतकरी आहे की नाही, याची पडताळणी केली जाते.
तसेच आधार कार्ड, बँक खाते आणि जमीन नोंदी यामधील माहिती अचूक असणे गरजेचे आहे. नावातील स्पेलिंग, खाते क्रमांक किंवा आधार क्रमांकातील छोटीशी चूक देखील हप्ता अडवू शकते.
शेतकऱ्यांनी अधिकृत पीएम किसान पोर्टलवर लॉग इन करून आपली माहिती तपासावी किंवा जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन आवश्यक दुरुस्त्या करून घ्याव्यात.
सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण केल्यास 22 व्या हप्त्याची रक्कम कोणत्याही अडथळ्याविना थेट बँक खात्यात जमा होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहून आवश्यक ती कामे तात्काळ पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे.












