Pune – Nagpur Railway : पुणे, अहिल्यानगर आणि नागपूर शहरातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने एक मोठा निर्णय घेतलाय. रेल्वे कडून पुणे ते नागपूर दरम्यान रक्षाबंधनासाठी आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विशेष गाडी चालवण्यात येणार आहे. रेल्वे कडून पुणे ते नागपूर रेल्वे मार्गावर दोन उत्सव विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.
या गाड्यांना अहिल्यानगर आणि कोपरगाव या स्थानकावर थांबा सुद्धा मंजूर करण्यात आला आहे. दोन उत्सव विशेष गाड्यांपैकी गाडी क्रमांक 01469 / 01470 ची पुणे ते नागपूर अशी एक आणि नागपूर ते पुणे अशी एक फेरी होणार आहे. तसेच गाडी क्रमांक 01439 / 01440 च्या पुणे ते नागपूर अशा दोन आणि नागपूर ते पुणे अशा दोन फेऱ्या होणार आहेत. यामुळे रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनानिमित्त आपल्या गावी जाणाऱ्या नागरिकांना या रेल्वेगाड्यांचा मोठा फायदा होणार अशी आशा आहे. दरम्यान आता आपण या विशेष गाड्यांचे संपूर्ण वेळापत्रक कसे राहणार याची माहिती पाहूयात.

स्वातंत्र्यदिनानिमित्त चालवल्या जाणाऱ्या गाडीचे वेळापत्रक
गाडी क्रमांक 01439 पुण्यावरून 14 आणि 15 ऑगस्ट रोजी सुटेल 19.55 वाजता सुटेल आणि अहिल्यानगर कोपरगाव मार्गे नागपूरला जाईल. गाडी क्रमांक 01440 नागपूरवरून 14 आणि 17 ऑगस्ट रोजी 16.15 वाजता सुटेल आणि वर्धा, बडनेरा मार्गे पुण्याला जाणार आहे.
रक्षाबंधन विशेष गाडीचे वेळापत्रक
गाडी क्रमांक 01469 पुण्यावरून आठ ऑगस्ट रोजी 19.55 वाजता सुटेल. गाडी क्रमांक 01470 नागपूरवरून पुणे रेल्वे स्थानकासाठी 10 ऑगस्ट रोजी 13.00 वाजता सोडली जाणार आहे. आता आपण या दोन्ही गाड्या या मार्गावरील कोणत्या स्थानकावर थांबा घेणार याची माहिती पाहूयात.
कोणकोणत्या स्थानकावर थांबणार विशेष गाडी
वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर या स्थानकांवर या दोन्ही उत्सव विशेष गाड्यांना थांबा देण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन स्थानकांवर ही गाडी थांबणार असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांचा प्रवास सोयीचा होईल.