अहमदनगर बातम्या

पारनेर तालुक्याला १२१ कोटी रूपये खरीपाचा पिक विमा: खा.लंके यांची माहिती

Ahmednagar News :मागील वर्षी म्हणजे सन २०२३ मधील पीक विम्यापोटी पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना १२१ कोटी रूपयांचा पिक विमा मंजुर झाला आहे. अशी माहिती खासदार नीलेश लंके यांनी दिली.

यापूर्वी १६ कोटी ५० लाख रूपयांचा सोयाबिन पिकासाठीचा विमा जमा झाला असून आता उर्वरीत पिकांसाठी १०५ कोटी रूपये असा एकूण १२१ कोटी रूपयांचा विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. अशी माहिती देखील खा. लंके  यांनी दिली आहे.

   तालुक्यातील हवामान तसेच नैसिर्गीक स्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ व्हावा यासाठी खा.लंके यांनी शासनाकडे पत्रव्यवहार तसेच पाठपुरावा केला होता. शासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनेचा लाभ मिळावा यासाठी खा.लंके हे नेहमीच प्रयत्नशिल असतात.
त्याचाच एक भाग म्हणून पिक विम्यासोबतच शेतकऱ्यांसाठी कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध वैयक्तीक लाभाच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी खा. लंके यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही पाठपुरावा केला होता. दरम्यान कोणत्या पिकासाठी किती विमा याची मंडलनिहाय आकडेवारी लवकरच जाहिर करण्यात येणार आहे.
  मागील वर्षीच्या खरीप हंगामात मुग, सोयाबिन, बाजरी, तुर, कांदा, उडीद या ७१ हजार २५५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा ५७ हजार १८५ शेतक-यांनी विविध १ लाख ४८ हजार ८३४ आवेदनपत्रांद्वारे पिक विमा उतरविला होता.
  दरम्यान, पिक विमा उतरविल्यानंतर तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबिनची अग्रीम रक्कम म्हणून १६ कोटी ५० लाख रूपये इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली असून, उर्वरीत १०५ कोटी रूपये इतकी रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.
पिक विम्यासंदर्भात काही अडचण असल्यास आपल्या पारनेर शहरातील संपर्क कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन खा. लंके यांनी केले आहे.
Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts