अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- निळवंडे प्रकल्पासाठी एका वर्षात निधी मिळण्याचे सर्व विक्रम महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामुळे मोडले गेले. मंत्री पदाचा पदभार स्वीकारताच निळवंडे पूर्ण करण्याचा ध्यास घेऊन प्रकल्पातील अनेक अडथळ्यांचे निराकरण करण्याचे काम त्यांनी लीलया पार पाडले.
यामुळे निळवंडे प्रकल्प वेगाने पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे. नाबार्डकडून कालव्यांच्या कामासाठी २०२ कोटी रुपयांचा निधी मिळविल्याबद्दल निळवंडे पाटपाणी कृती समितीने आभार मानले आहे. अवघ्या ३ महिन्यात निधी मंत्री थोरातांनी उपलब्ध करुन घेतला आहे.
ही सोपी गोष्ट नव्हती. प्रस्ताव सादर झाल्यानंतर नाबार्डच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकल्पाला भेट देत भूसंपादन ते संपूर्ण कामा संदर्भातील गोष्टींचा प्रकर्षाने विचार केला. कोरोना या महाभयंकर संकटात देखील भूसंपादन पूर्ण होऊन कालव्यांच्या कामात झालेला कायापालट या बाबी लक्षणीय ठरल्या.
नाबार्डच्या वरिष्ठ अधिकारी उमा महेश यांच्या प्रत्यक्ष भेटीनंतर मंत्री थोरात यांनी दाखवलेली तत्परता याचे फलित म्हणजे नाबार्डकडून मिळालेली २०२ कोटी रुपये होय.
निळवंडे पाटपाणी कृती समितीचे मार्गदर्शक गोपीनाथ घोरपडे, अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे, कार्याध्यक्ष गंगाधर गमे, सचिव दादासाहेब पवार, मच्छिंद्र एलम, संजय एलम, जालिंदर लांडे, रावसाहेब कोल्हे, रविंद्र वर्पे, डॉ. रवींद्र गागरे, किरण गव्हाणे, संजय शेटे,
विनोद मुसमाडे, सोपानराव जोंधळे, अरुण पोकळे, विजय ढोकचौळे, नितीन गमे, रामनाथ बोऱ्हाडे, सुभाष निर्मळ, योगेश निर्मळ, राजेंद्र निर्मळ, विजय निर्मळ, अशोक खंडागळे,
संदीप गमे, महादू कांदळकर, किशोर गागरे, दिपक हारदे, अनिल हारदे आदींसह लाभधारक शेतकरी वर्गाने मंत्री थोरात यांचे विशेष आभार मानले.