Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्याचा चेरापुंजी (Cherrapunji) समजल्या जाणार्या रतनवाडीमध्ये (Ratanwadi) तब्बल 131 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पाऊसामुळे भंडारदरा धरणात 21 दलघफू पाणी दाखल झाले आहे. भंडारदरातील पाणीसाठा 2467 दलघफू आहे.
पाणलोटात मान्सून रविवारी दाखल झाला. परिसरात या दिवशी सायंकाळी पाच वाजेपासून अधूनमधून सरी कोसळत आहेत. भंडारदरा 13, घाटघर 40, पांजरे 29, रतनवाडी 131 तर वाकी 9 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे डोंगर दर्यांमधील छोटे ओढे-नाले सक्रिय झाले असून धरणाच्या पाण्यात विसावू लागले आहेत.
काल सोमवारीही पाणलोटात पावसाळी वातावरण टिकून होते. काल दिवसभरात भंडारदरात 9 मिमी पावसाची नोंद झाली आहे. अधूनमधून रिपरिप सुरू आहे. पाणलोटातही अधूनमधून सरी कोसळत आहेत. पाऊस पडता झाल्याने या भागातील शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे.
112 दलघफू क्षमतेच्या वाकी तलावात यंदा साठा चांगला असून पावसाचे प्रमाण वाढल्यास दोन तीन दिवसांत हा तलाव निम्मा भरले अशी शक्यता आहे.